आधी मैत्री नंतर लग्नाचे आमिष देऊन बलात्कार ,एकदा गर्भपात केलाच्या धक्कादायक प्रकाराने खळबळ पोलिसात गुन्हा दाखल

 

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

लग्नाची आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करून गर्भपात केल्याचा धोक्कादायक प्रकार यावल तालुक्यातील उघडकील आला आहे . याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आली असून अटक करण्यात आली आहे

या बाबत अधिक माहिती अशी आहे की यावल तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय तरुणी ही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे गावात राहणारा निलेश पंढरीनाथ पाटील
याची तरूणीशा
२०२१ मध्ये ओळख निर्माण झाली व मैत्रित रूपांतर झाले. त्या नंतर तरुणीली निलेशने लग्राचे आमिष दाखवत तिच्या आजीच्या घरी आणि
त्यांच्या खळ्यात तरुणीवर जून 2022 पर्यंत वेळोवेळी वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून तरुणी गर्भवती राहिली ही माहिती निलेशला समजल्यानंतर त्याने तरुणीची इच्छा नसताना गर्भपात केल्याचा धोक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान,तरूणीने नातेवाईकांसह यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी निलेश पाटील याच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे करीत आहे

Leave a Comment