सोलापूर प्रतिनीधी : देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली केंद्र सरकारने जनहिताचे लोककल्याणकारी निर्णय घेऊन, विविध योजना आणून कार्यान्वित केल्याअसून. सोलापुरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आनंद मधुकर गोसकी यांनी जनआधार फाऊंडेशनच्या माध्यमातून त्याचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अष्टोप्रहर मेहनत घेत आहेत. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून लाभार्थांकडून झालेल्या एक हजार लाभार्थ्यांतील सर्व योजना मिळुन 400 लाभार्थ्यांनकडुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं कृतार्थ भावनेने आभार व्यक्त करण्यासाठी आभारपत्रं पाठवून देणार असल्याचे आनंद गोसकी यांच्याकडुन सांगण्यात आले.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुष्यमान भारत योजनेंर्गत सामान्य घटकातील रुग्णाला शासनाने निश्चित केलेल्या काही खासगी रूग्णालयात ५ लाख खर्चापर्यंतचे मोफत उपचार होतात. या योजनेसाठी जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक आणि भाजपचे कार्यकर्ते आनंद मधुकर गोसकी यांनी शिबीराच्या माध्यमातून एक हजार लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड बनवून दिले.
पी. एम. स्वनिधी योजनेंतर्गत फेरीवाले, भाजीवाले, चहा कॅन्टीन अशा छोट्या-छोट्या व्यवसायांना चालना मिळावी, या उद्देशाने पी.एम. स्वनिधी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. महापालिका युसीडी विभागामार्फत अनेकांना सीएसी सेंटरच्या माध्यमातून जनआधार फाऊंडेशनने अर्ज भरून देऊन, १४० लाभार्थ्यांना, १० हजार रूपयांचं मिळवून दिले. दुसऱ्या टप्यात पी.एम. स्वनिधीच्या माध्यमातून २० हजार रूपयांचे कर्ज मिळवून दिले. कोरोनाच्या काळात कोव्हिड लसीकरण शिबीर राबवुन दिलेल्या नागरीकांकडुनही मोदीजींचे आभार व्यक्त केले.
‘चुल मुक्त भारत’ या अभियानांतर्गत प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या माध्यमातून २९० गॅस कनेक्शन, गॅस, शेगडी, रेग्युलेटर, लाईटरचे सेट लाभार्थांना देण्यात आले, या सर्व लाभार्थांक देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जूना प्रभाग क्र. ०८ नविन प्रभाग क्र १५ व जनआधार फाऊंडेशनच्या वतीने प्रत्येक्ष घरोघरी जाऊन प्रभागातील नागरीक कुठल्या योजनेचा लाभ याची विचारणा करून केंद्रसरकार च्या योजनेचा लाभ गेतलेल्या अशा सर्व लाभार्थ्यांकडून, ‘धन्यवाद मोदीजी ! शुभेच्छा पत्र लिहून घेऊन भाजप शहर कार्यालयात शहराध्यक्ष विक्रम देशमुख शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख , प्रशांत फत्तेपुरकर आणि ‘धन्यवाद, मोदीजी’ उपक्रमाचे संयोजक दत्ता पाटील सर दत्ता बडगु यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘धन्यवाद, मोदीजी’ लाभार्थ्यांकडुन भरून घेतलेले पोष्ट कार्ड सोलापूर भाजपा शहर कार्यालयातुन प्रदेश कार्यालयात पाठणार आल्याची माहिती भाजपा कार्यकर्ते धन्यवाद मोदीजी या अभियानाचे सहसंयोजक आनंद मधुकर गोसकी यांनी दिली.