Home बुलढाणा आर .आर .आबा पाटील सुंदर गाव स्पर्धेत जळगाव जा तालुक्यातील सुनगाव ने...

आर .आर .आबा पाटील सुंदर गाव स्पर्धेत जळगाव जा तालुक्यातील सुनगाव ने पटकाविला सुंदरगाव होण्याचा पुरस्कार

467
0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

आर आर आबा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज 16 फेब्रुवारी रोजी तालुका सुंदर व जिल्हा सुंदर गाव पुरस्कार योजनेचे बक्षीस वितरण करण्यात आले स्पर्धेच्या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी सभागृह येथे घेण्यात आला यात जिल्ह्यातून पहिला पुरस्कार मोताळा तालुक्यातील माकोडी गावाला मिळाला व जळगाव जामोद तालुक्यातील पहिला पुरस्कार सुनगाव या गावाने पटकाविला या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मनिषा ताई पवार उपाध्यक्ष सौ कमल ताई बुधवत सभापती रियाज खान पठाण जिल्हाधिकारी एस राममूर्ती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते पंचायत समिती मोताळा सभापती प्रकाश बसी आदी उपस्थित होते जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा ताई पवार म्हणाल्या की या स्पर्धेत सहभाग नोंदवत पारितोषिक मिळालेल्या ग्रामपंचायतीपासून अन्य ग्रामपंचायतीने प्रेरणा घ्यावी व पुढील वर्षी आपल्या ग्रामपंचायतला कसे पारितोषिक मिळेल या दृष्टीने काम करावे सन 2019 20 चे उत्कृष्ट कामगिरी केलेले तालुका सुंदर गाव म्हणून जळगाव जा तालुक्यातून सूनगाव या गावाचे प्रथम विजेते म्हणून घोषित करण्यात आले या पुरस्काराचे स्वरूप दहा लाख रुपये असे आहे यावेळी हा पुरस्कार सूनगाव चे सरपंच रामेश्वरभाऊ अंबडकार व गग्रामविकास अधिकारी चौधरीसाहेब यांनी एस राम मूर्ती जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला सन 2019 20 च्या स्पर्धे मध्ये गावाला जो पुरस्कार मिळाला तो तत्कालीन सरपंच यांच्या कार्यकाळातील कामगिरीबद्दल मिळाला आहे याचे श्रेय येथील माजी सरपंच विजयाताई पुंडलीक पाटील व उपसरपंच व सदस्य गावकरी यांचे आहे यावेळी हा पुरस्कार स्वीकारतांना सूनगाव चे सरपंच रामेश्वर भाऊ अंबडकार ग्रामविकास अधिकारी टी जी चौधरी व पंचायत समिती जळगाव जामोद चे गट विकास अधिकारी भारसाकडे साहेब उपस्थित होते

 

Previous articleट्रोल, ड‌िझेल दरवाढीविरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
Next articleकिनगाव पपई ट्रक पलटी भिषण अपघातातील व्यापारी आणी वाहन चालकास तिन दिवसाची पोलीस कोठडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here