आळसना शिवारात रेल्वेच्या धडकेत जलम येथील दुचाकी स्वार जागीच ठार..

 

इस्माईलशेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

आपल्या दुचाकीने शेगाव आळसना मार्गाने जलम कडे जात असलेल्या दुचाकी स्वराला रेल्वेची जोरदार धडक लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार जलम येथील सुधाकर नरवाडे व 39 वर्षे हा शेगाव येथे खाजगी दुकानावर काम करण्यासाठी स्वतःच्या दुचाकीने ये- जा करीत होता.

नेहमीप्रमाणे तो 23 सप्टेंबर रोजी आपली ड्युटी संपवून दुचाकी ने आळसना मार्गाने जलम कडे रात्री जात असताना.

पावसामुळे रस्ता बंद असल्याने रेल्वे लाईन बाजूला असलेल्या कच्च्या रस्त्यावरून जात असताना मागून आलेल्या रेल्वेची धडक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी मार्ग दाखल केला आहे

Leave a Comment