आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वंदिले यांना दिले निवेदन

 

हिंगणघाट:- मागील चार महिन्यापासून आशा व गटप्रवर्तक केंद्र शासनाच्या नियमित कामाचा मोबदला मिळालेला नाही. पोलिओ,कुष्ठरोग,शयरोग,आरोग्य वर्धिनीचा मोबदला मिळालेला नाही.कोविड लसीकरण मोहीमेत दिवस-रात्र काम करून देखील यांच्या शासनाकडून कोणताही मोबदला मिळालेला नाही. मागील ”हर घर दस्तक” मोहिमेची आशा व गटप्रवर्तकांनी सर्व माहिती शासनापर्यंत दिलेली आहे. १ जून २०२२ पासून शासनाने पुन्हा ”हर घर दस्तक” मोहीम सुरू केलेली आहे. या कामासाठी शासनाने कोणताच मोबदला जाहीर केलेला नसून आशा व गटप्रवर्तकांनी विनामोबदला काम करावे अशी शासनाची भूमिका आहे शिवाय मार्च २०२२ पासून कोविड -19 च्या सर्वेचा मोबदलाही बंद करण्यात आलेला आहे. आशा व गटप्रवर्तकांना वेळेवर व नियमित केलेल्या कामाचा मोबदला मिळत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली असताना त्यांच्याकडून आरोग्य विभागातील अधिकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून दबाव टाकून जबरदस्तीने हे काम करण्यास सक्ती केली जात आहे.

वरील सर्व परिस्थिती गंभीर असून यामुळे आशा व गटप्रवर्तक कामामध्ये नाराजी आहे तीव्र नाराजी आहे वरील सर्व बाबींचा विचार करून आशा व गटप्रवर्तक कांचन काम त्यांच्या कामाचा मोबदला नियमित व वेळेवर मिळवून देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांना निवेदन देण्यात आले ..
यावेळी वर्धा जिल्हा आशा -गतप्रवर्तक अध्यक्ष अलका जराते,सचिव अर्चना घुंगरे, कार्याध्यक्ष मीनाक्षी गायकवाड उपस्थित होते… नईम मलक हिंगणघाट

Leave a Comment