आषाढी एकादशी निमित्त शेगाव येथे लाखो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन..

 

 

इस्माईल शेखशेगाव शहर प्रतिनिधी

आषाढी एकादशी निमित्त आज 29 जून रोजी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज मंदिरात लाखो भाविकांनी श्रींच्या समाधी मंदिराचे दर्शन घेतले पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी करणे सुरू केले होते जे भाविक आषाढीला पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शना निमित्त जाऊ शकत नाही असे भाविक विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

संत नगरी शेगाव शहरात श्रीं संत गजानन महाराज मंदिरामध्ये येऊन श्री संत गजानन महाराजांचे समाधी मंदिराचे व श्रींच्या शयन गृह जवळील विठ्ठल रुक्माई चे दर्शन घेत असतात आज गुरुवार 29 जून रोजी आषाढी निमित्त मंदिरात पहाटे पासूनच आलेल्या लाखो भाविकांनी दर्शन बारी मध्ये तीन ते चार तास अतिशय श्रद्धेने व शिस्तबद्ध रीतीने उभे राहून श्रींच्या समाधी मंदिराचे दर्शन घेतले त्याचप्रमाणे राम लक्ष्मण सीतामाता व हनुमंताच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर आषाढी एकादशी तिथी सोबतच आज श्रींचा पवित्र गुरुवार चा दिवस अशा दुहेरी संयोग मिळून आल्याने

हजारो भाविकांनी पारायण ग्रहांमध्ये पहाटेपासूनच श्री दासगणू महाराज लिखित श्री गजानन विजय ग्रंथाचे 21 अध्यायाचे भक्ती मय वातावरणामध्ये पारायण केले आज श्रींच्या गुरुवारच्या दिवशी आषाढी एकादशी तिथी आल्याने मंदिरामध्ये दर्शनाकरिता भाविकांची गर्दी नेहमीपेक्षा दुप्पटीने वाढलेली दिसत आहे संध्याकाळी साडेपाच वाजता श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातून श्रींच्या रजतमुखाची शेकडो टाळकरी भगवा ध्वजथारी यांच्यासह गण गण गणात बोते चा गजर करीत आषाढी एकादशी निमित्त पालखी करण्यात आली पालखीमध्ये शेकडो भावीक सहभागी झाले होते

यावर्षी हिंदू धर्मियांचे पवित्र तीथी आषाढी एकादशी व मुस्लिम धर्मियांचे बकरी ईद हे दोन्ही एकत्रित एकाच दिवशी आल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ नये याकरिता शेगाव येथील कर्तव्यदक्ष डी वाय एस पी विवेक पाटील शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शेगाव शहरात ठीक ठिकाणी पोलिसांचा चौक बंदोबस्त लावण्यात आला दुपारी दोन वाजता श्रींच्या मंदिरातून पालखी काढण्यात आली

Leave a Comment