इराणी टोळीतील विदेशी नागरीक डी.बी. पथका कडुन अटक 9,54133 रू. चा माल जप्त,

0
552

 

 

सचिन वाघे हिंगणघाट

हिंगणघाट :- 12 ऑक्टोंबर
भारत देशातील विविध राज्यातील एकुन 10 गुन्हे उघड.
दि. 06/10/2022 रोजी फिर्यादी शासकिय कर्तव्यावर हजर असतांना त्यांना पोलीस निरीक्षक हिंगणघाट के. एम. पुंडकर यांनी माहिती दिली कि. धोत्रा कडुन हिंगणघाट कडे एक सिल्वर रंगाची स्विफ्ट डिझायर कार क. KA-02 MK-0744 येत असुन त्यामधे एक संशयीत ईराणी आरोपी असल्याची माहिती मिळाल्याने पोलीसांनी हैद्राबाद नागपुर नॅशनल हायवे क. 44 (7) वरील महाकाली नगरी, येथे हैद्राबाद कडुन नागपुर कडे येणाऱ्या रोड वर नाकाबंदी करीत असता नमुद कार ही भरधाव वेगाने हैद्राबाद कडुन नागपुर कडे येतांना दिसली.

करीता नमुद कर्मचारी यांनी संपुर्ण रस्ता लगेच बॅरीकेड ने बंद केला आणि कारला थांबवण्याचा प्रयत्न केला. सदर कारच्या चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी थांबवुन पळुन जाण्याच्या उददेशाने गाडी वळवली आणि यातील फिर्यादी यांच्या गाडीला जिवे मारण्याच्या उददेशाने धडक देवुन त्यांना जखमी केले आणि गाडीचे नुकसान केले. कर्तव्यावर हजर असलेले कर्मचारी पोहवा शेखर डोंगरे, नितिन राजपुत, नापोशि निलेश तेलरांधे, अझहर खान, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी नमुद गाडीची बॅरीकेड्सच्या मदतीने अडणुक केली आणि आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपी विरूद्ध पोलीस स्टेशन, हिंगणघाट येथे गुन्हा दाखल करून त्याच्या ताब्यातुन बनावट नबंर प्लेट ची स्विफ्ट डिझायर कार क. KA-02-MK-0744 सह विदेशी चलनाच्या नोटा, मोबाईल व इतर इलेक्ट्रानिक महागडया वस्तु असा एकूण जु.कि. 9,54133 रू. चा माल जप्त करून त्याचा मा. विदयमान कोर्टातुन पिसिआर घेतला असता, तपासात सदर आरोपी हा इराण देशाचा रहीवासी असुन त्याने भारतात मध्य प्रदेश, कनार्टक, रत्नागिरी, पुणे, चिमुर, वरोरा, वर्धा व विविध ठिकाणी हात चलाखीचे गुन्हे केल्याचे सिसिटीव्ही फुटेज व्दारे माहीती प्राप्त झाली आहे. तसेच सदर दाखल गुन्हयातील एफ.आय.आर. प्राप्त करण्यात आल्या आहे. सदर आरोपीने भारतात 10 गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन इतर ठिकाणी आणखी गुन्हे उघड येण्याची दाट शक्यता आहे.
सदरची कार्यवाही ही मा. श्री. प्रशांत होळकर पोलीस अधिक्षक साहेब, वर्धा, मा. यशवंत सोळंके, अपर पोलीस अधिक्षक, वर्धा. मा. श्री. दिनेश कदम उपविभागीय पोलीस अधिकारी सा. हिंगणघाट, कैलाश पुंडकर, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात प्रशांत पाटणकर सहा. पोलीस निरीक्षक हिंगणघाट, डी.बी. पथकाचे पोहवा शेखर डोंगरे, नापोशि निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर, वाहतुक शाखेचे पोहवा नितिन राजपुत, नापोशि अझहर खान, व पोहवा जगदीश चव्हाण यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here