उत्तम आरोग्यासाठी शिक्षकांनी सायकलचा वापर करावा- अनिल जवादे

0
724

 

(हिंगणघाट)
लहानपणी बऱ्याच लोकांनी सायकल चालवीली असेल पण सध्या सायकलींगला कुणी फारसे महत्त्व देतांना दिसत नाही.पण आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य चांगले ठेवणे हे एक मोठे आव्हान झालेआहे.या पार्श्वभूमीवर डाॕ.बी.आर.आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचीव अनिल जवादे यांनी डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालयात निसर्ग मित्र हौसी सायकल क्लब ची स्थापना केली.या क्लबचे उद्घाटन निसर्ग प्रेमी माजी प्राचार्य प्रभाकर कोळसे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी निसर्ग मित्र नियाजूद्दीन सिद्धीकी, संस्थेचे कोषाध्यक्ष जी.एस.भगत , प्राचार्य एस,एम.राऊत , संस्थेचे संचालक बी.ए.पाटील ,चंद्रकांत नगराळे,उपप्राचार्य एच.पी.गुडदे ,उपमुख्याध्यापीका सुनीता बन्सोड,पर्यवेक्षीका सुनीता खैरकर ,दिनेश वाघ , रवी शिरपूरकर ,निसर्ग मित्र अशोक बन्सोड ,आशिष भोयर यांची विशेष उपस्थिती होती.
आपल्या अध्यक्षीय भाषणात अनिल जवादे म्हणाले,पर्यावरण रक्षणासाठी, कोरोणाच्या येणाऱ्या व अन्य आजाराच्या लाटा रोखण्यासाठी आणि आपल्या उत्तम आरोग्यासाठी सायकल चालवीणे हा एक महत्वाचा पर्याय आणि गरज निर्माण झाली आहे.सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आपल्या दैनंदिन कामकाजासाठी येताना आणि जाताना सायकलचा वापर केला पाहिजे .यामुळे पर्यावरण रक्षण आणि उत्तम आरोग्य राखले जाईल . शिक्षकांचे आरोग्य निट असेल तर शिक्षकांचे अध्यापनही दर्जेदार होईल.विद्यार्थी सुद्धा शिक्षकांचे अनुकरण करून त्यांनाही सायकल चालविण्याचे महत्त्व कळेल.तसेच लोकांचाही सायकल चालविण्याचा कल वाढेल.निसर्ग मित्र हौसी सायकल क्लबच्या माध्यमातून शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी रोज शाळेत येतील असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि संचालन निसर्ग मित्र गोपाल मांडवकर यांनी केले.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक प्रभाकर कोळसे , निसर्ग मित्र नियाजूद्दीन सिद्धीकी,प्राचार्य एस.एम.राऊत यांचेही मार्गदर्शनपर भाषणे झाली.यावेळी उपस्थितीत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी दररोज सायकलनी शाळेत येण्याचा मनोदय व्यक्त केला.त्यानंतर आरोग्य संवर्धनासाठी सायकलचा वापर करा हा संदेश जनतेला देण्यासाठी निसर्ग मित्र हौसी सायकल क्लबच्या सदस्यांनी अनिल जवादे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख रस्त्यावरून सायकल रॕली काढली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here