Home Breaking News उद्या मतमोजनी .निकालाची उत्सुकता शिगेला !उमेदवाराची धाकधूक वाढली !प्रशासन सज्ज !

उद्या मतमोजनी .निकालाची उत्सुकता शिगेला !उमेदवाराची धाकधूक वाढली !प्रशासन सज्ज !

306
0

 

सिंदखेड राजा l ( सचिन खंडारे )

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतिशय महत्वाच्या अशा सिंदखेडराजा तालुक्यातील 39 ग्रामपंचायत साठी15 जानेवारीला मतदान घेण्यात आले होते किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले काही ठिकाणी तर वाद होता होता टळले !तालुक्यातील किनगाव राजा ‘दुसरबीड ‘साखरखेर्डा ‘मलकापूर पांग्रा ‘शेंदुर्जन ‘सोनोशी ‘अशा मोठ्या ग्रामपंचायत साठी सुद्धा मतदान झाले ‘सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या व संवेदनशील समजल्या जाणाऱ्या साखरखेर्डा येथे सुद्धा मतदान शांततेत पार पडले यावेळी दोन्ही पॅनल कडून दिग्गज आजी-माजी उमेदवार तथा जिल्हा परिषद सदस्यांचे वर्चस्व पणाला लागले होते ‘आता काही तासांचा अवधी शिल्लक बाकी असून दावे-प्रतिदावे प्रत्येक उमेदवाराकडून केल्या जात आहे !शेवटी 18 जानेवारीला कोण बाजी मारेल याकडे सर्वांच्या नजरा असेल !यासाठी ग्रामपंचायतच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून ।सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल !

Previous articleभारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरोधात घृणास्पद लिखाण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा. भाजपची ज्ञानेश वाकुडकर विरोधात पोलिसात तक्रार.
Next articleविश्वशांती बुद्ध विहार सवडद बांधकामासाठी .वर्गणी सुरु !सढळ हाताने दान करावे बुद्धविहार समितीच्या वतीने आव्हान !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here