Home बुलढाणा ऊकळी -सुकळी येथे संविधान दिन साजरा !

ऊकळी -सुकळी येथे संविधान दिन साजरा !

358
0

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मेहकर तालुक्यातील ऊकळी सुकळी ता.मेहकरतेथे संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी येथील तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्यच्या वतीने संविधान दिन साजरा…! ऊकळी सुकळी ता.मेहकर येथील तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्यच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाटीकेमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.आणी ऊकळी सुकळी येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये तथागत ग्रुप महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री संदिप भाऊ गवई यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन केले व त्यांनी छोटेखानी भाषणामध्ये सांगितले की,भारतीय इतिहासातील संविधानच्या अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली असली तरी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे “भारतीय संविधान” 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस,अहोरात्र मेहनत घेऊन या संविधानाची निर्मिती केली,या रोजी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्‍या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. म्हणून 26 नोव्हेंबरला हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.भारतीय संविधानांचा विजय आसो आदी घोषंनी संपूर्ण परिसर दणाणुन सोडला.. या प्रसंगी तथागत फाउंडेशन व तथागत ग्रूप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा,श्री.संदिप भाऊ गवई , मा.सुभाष भाऊ बैलके, मा.अनिल भाऊ देबाजे मा.अख्तर भाई कुरेशी,कुणाल भाऊ माने, कैलास दुगाने,सतीश शेटाने, प्रमोद अंभोरे, सुरज शेटाने, हर्षल राऊत शरद तुरूकमाने, विनायक तुरूकमाने,आवारे साहेब,शशिकांत धांडे ,करण राऊत, रोहित तुरूकमाने, आदित्य तुरूकमाने,सुमित झरे, अमर अंभोरे,यांची उपस्थित होती..!

Previous articleहिवरा आश्रम येथे संविधान दिन साजरा
Next articleतथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने संविधान दिन साजरा..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here