कटंगीची आदर्श ग्रामपंचायतीकडे वाटचाल;सरपंचसह गावकऱ्यांनी घेतला पुढाकार

 

गोंदिया शैलेश राजनकर

गोरेगाव : तालुक्यातील कटंगी बुजरूकचे सरपंच तेजेंद्र हरिणखेडे हे उच्च शिक्षित असल्याने गावकऱ्यांनी गावाचा विकास करण्यासाठी निवडून दिले. त्यांनी आदर्श ग्राम गावांची पदाधिकाऱ्यांसह पाहणी करून सर्वप्रथम गावाला हागणदारीमुक्त गाव केले. विविध विकास योजनेंतर्गत विकास कामे केल्याने तालुका स्मार्ट गाव पुरस्कार, जिल्हा स्मार्ट गाव पुरस्कार मिळविले. गावकऱ्यांच्या सहकार्याने आदर्श ग्राम पुरस्काराकडे हे गाव वाटचाल करीत आहे.
कटंगी बुजरूक येथे 597 कुटुंब संख्या असून 2 हजार 643 लोकसंख्या आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 232 व अनुसूचित जमातीची लोकसंख्या 295, इतर जातीची लोकसंख्या 2 हजार 116 आहे. गावातील लोकसंख्या शिक्षित असल्याने ग्रामसभेमार्फत हागणदारीमुक्त गाव, स्वच्छता अभियान, विविध योजनांची माहिती दिली व सर्वप्रथम पुरस्कार प्राप्त गावांना भेटी देऊन तेथील विकास कामांची माहिती घेतली. गावाला विकास मार्गावर आणण्यासाठी सर्व कुटुंबांना शौचालय इमारत बांधकामाचा लाभ मिळवून घेतल्याने उघड्यावर शौचास जाणे बंद झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले शेणखताचे खड्डे माटी भरून सपाटीकरण केले व गावात स्वच्छता अभियान राबविण्यात यश आले. त्यामुळे या गावाला शासनाच्या योजनेतून पुरस्कार मिळाले. या पुरस्कार रक्कमेतून बंदीस्त नाली बांधकाम, प्रवासी निवारा दुरुस्ती, सभामंडप दुरुस्ती, अंगणवाडी शौचालय बांधकाम, डिजीटल शाळा, विद्यार्थ्यांना गणवेश, शुद्ध पिण्याचे पाणी, पथदिवे या सारखे काम केल्याने तालुका स्मार्ट गाव पुरस्कार प्राप्त केले. गावाच्या विकास कामांची पाहणी जिल्हा स्मार्ट गाव समितीने केली असता जिल्हा स्मार्ट गाव म्हणून 40 लाख रुपयांचे पुरस्कार मिळाले. कटंगी बुजरूकला स्मार्ट गाव पुरस्कार मिळाले असले तरी हे गाव आदर्श गाव करण्याचे स्वप्न सरपंच तेजेंद्र हरिणखेडे यांनी पाहुन 40 लाख रुपये पुरस्कार रक्कमेतून विकास कामांना गती दिली आहे. आदर्श गाव करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेसमोर फलोत्पादन प्रकल्प, व्यायाम करता यावे यासाठी खुले जीम साहित्य बसविले. ग्रामपंचायत कार्यालय सुशोभित केले. आंगणवाडी केंद्राजवळ ऑक्सीजन पार्क, दोन सार्वजनिक शौचालय बांधकाम, 4 सौर ऊर्जेवर चालणारे दुहेरी हातपंप, शाळेत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आरओ बसविले. वृद्धांना बसण्यासाठी खुर्च्या सर्व वार्डात लावले. झाडांना पाणी देण्यासाठी ट्रिप सिंचन योजना सुरू केली. घनकचरा व्यवस्थापन केंद्र तयार करून महिला बचत गटांना जबाबदारी दिली आहे. दहन भूमीचे सपाटीकरण, धार्मिक स्थळ परिसराचे सपाटीकरण करून गावकऱ्यांना आदर्श कल्पना देण्याचे काम सरपंच तेजेंद्र हरिणखेडे करत आहेत. गावाला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी सरपंच यांनी 3 वर्षात केलेल्या कामाची पावती म्हणून गावकरी जोमाने कामाला लागले. उमेद अंतर्गत असलेले सर्व महिला बजतगट, माहीम महिला बचत गटाच्या महिलांना गाव विकास कामांसाठी सिहांचा वाटा असून आदर्श गाव करण्याचे संकल्प महीला बचतगट, जेष्ठ नागरिक, युवा मंडळी, सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी घेतला आहे.

Leave a Comment