कराडजवळील सैदापुरात तीन सख्ख्या बहिणीचा मृत्यू…अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज….

 

साताऱ्यातील कराड तालुक्यातील सैदापूर गावातील सासवे कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींचाअन्नातून विषबाधा झाल्याने मृत्यू झाला आहे…

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..आयुषी शिवानंद सासवे (वय 3 ), आस्था शिवानंद सासवे (वय 9), आरुषी शिवानंद सासवे (वय 8) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत…

गुरुवारी रात्री सर्वांनी एकत्रित जेवण केल त्यानंतर आईसह या तीन मुलींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. यामध्ये तीन मुलींना जास्त त्रास झाल्याने कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर सासवे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.मृत्यू झालेल्या मुलींचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून तो पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

घटनेचा पोलीस तपास करीत आहेत…

Leave a Comment