कर्जबाजारी ला कंटाळून लोखंडा येथील 38 वर्षीय शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या..

 

रत्नाताई डिक्कर खामगाव प्रतिनिधी

खामगाव: कर्जबाजारी ला कंटाळून खामगाव तालुक्यातील लोखंडा येथील 38 वर्षीय मोहन किसना लोखंडकर नावाच्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यातील लोखंडा येथील मोहन किसना लोखंड याला बँक ऑफ महाराष्ट्र खामगाव कडून कर्ज तडजोडी आणि कर्जाची थकीत रक्कम 55 हजार 560 रुपये भरण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली होती

निसर्गाचा लहरीपणा नापिकी यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या लोखंडा येथील शेतकरी मोहन किसना लोखंडकर 38 वर्षे याने थकीत कर्ज नोटीस मिळाल्यामुळे शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुरुस्ती झाली आहे वृत्त शेतकरी मोहन लोखंडकार याला एक मुलगा एक मुलगी असे कुटुंबीय आहे

Leave a Comment