कलाध्यापक उत्तम वानखेडे यांना ” राष्ट्रीय रत्न ” पुरस्कार प्राप्त उपक्रम प्रिय कलाध्यापक उत्तम वानखेडे (केसरीमल नगर विद्यालय सिंदी रेल्वे) यांना युवभाग्य फुड्स लि.कंपनी,ढगा व डाॅ.मनोहर आडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने “युवराज फुड्स चा पहिला वर्धापन दिनानिमित्त”राष्ट्रीय पुरस्कार व व्याख्यान

गुड्डू कुरेशी सिंधी रेल्वे

” दि .१९/११/२२ला स्थळ:- माधवराव काठावाले सभागृह अप्रोच रोड, वरुड, जिल्हा-अमरावती येथील आयोजित सोहळ्यात कार्यक्रम विशेष आकर्षण व अतिथी मिस इंडिया युनिवर्स, निर्माती व अभिनेत्री *रुपल मोहता* यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील कलाशिक्षणाबद्दल केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल ” *राष्ट्रीय रत्न* ” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन स्त्री रोग व प्रसुती तज्ञ तथा सत्य शोधक फाउंडेशन चे माजी अध्यक्ष डॉ मनोहर आडे,व रोटरी क्लब च्या अध्यक्षा डॉ सोनाली आडे कार्यक्रमाचे अध्यक्ष जांयंट्स गृप ऑफ वरुड चे माजी अध्यक्ष श्री नितीन खेरडे प्रमुख अतिथी रितेश शहा, राजेंद्रजी आडे, रमेजी चिचकार, प्रफुल्लजी अनासाने, विलास कडू, अनिकेत फुटाणे, राहुल कुबडे, जनार्दन निंबुरकर, श्याम गावडे, अर्चना शिष्याने, मनोज ठेवले, आयोजक युवराजजी ठाकरे, नितिन ठाकरे, डायरेक्ट भाग्यश्री वानखेडे तर याप्रसंगी “शून्यातून विश्व निर्माण करणारी ….” आज ५०० करोडचा बिझनेस करणारी व २५०० महिलांच्या हाताला काम देणारी महिला ” सुपरिचित असलेल्या *कमल परदेशी* यांचे विशेष व्याख्यान संपन्न झाले.
या सोहळ्याप्रसंगी जांयंट्स गृप वरुड चे माजी अध्यक्ष नितीन खेरडे व निता खेरडे, दिलीप वानखेडे यांचा सत्कार घेण्यात आला…. तसेच देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकुण २५ व्यक्तीला व महिलांना *राष्ट्रीय स्तरावरील* *”राष्ट्रीय रत्न”* हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
उपक्रम प्रिय कलाध्यापक उत्तम वानखेडे हे आपल्या कलाशिक्षण क्षेत्रात विविध कला प्रयोग करीत असतात. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी व त्यांच्या उन्नतीसाठी नेहमी नवनवे प्रयोग, विविध स्पर्धा, परीक्षा, विविध उपक्रम राबवित असतात.व याच त्यांच्या अनोख्या कलाशिक्षण क्षेत्रातील प्रयोगामुळे, उपक्रमामुळे युवभाग्य फुड्स प्रोडुसर लि.कंपनी ढगा व डॉ मनोहर आडे मित्र परिवार यांनी कलाध्यापक उत्तम वानखेडे यांची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील “राष्ट्रीय रत्न”पुरस्कार देऊन गौरविण्यात आले….
शाळेचे मुख्याध्यापक विलासराव येखंडे, पर्यवेक्षक अनिल चांदेकर शाळेचे अध्यक्ष श्री अतुलभाऊ टालाटुले ,सचिव राजुभाऊ पात्रिकर, कोषाध्यक्ष अशोकराव दवंडे,सदस्या निताताई टालाटुले व इतर सदस्यगण, शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पत्रकार , व्यापारी गण, विदर्भ साहित्य संघ शाखा सिंदी चे पदाधिकारी इत्यादींनी वानखेडे सरांच्या यशस्वीतेकरीता व सिंदी शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले बदल अभिनंदनाचा वर्षाव व कौतुक केले ….

Leave a Comment