कार आणि दुचाकीची धडक 6 लोकांचा मृत्यू तर एक गंभीर

 

अचलपूर /अशोक वस्तानी

परतवाडा-बैतुल मार्गावरील निंबोरा फाट्याजवळ रात्री 11 ते 12वाजताचे च्या दरम्यान इनोव्हा कार क्र.MH,20,DJ 8003 आणि होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र.MH,27/,S 4670 यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार ठाणेदार ष पोलीस कर्मचारी रात्रीच्या सुमारास निंबोरा फाट्याच्या पुलावर गस्त घालत असताना कारमधून खाली उतरून आजूबाजूला पाहिले. अपघातग्रस्त कार आणि मोटारसायकल दिसली, पोलिसांनी तात्काळ कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि सर्व जखमींना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तपासा अंती ६ जणांना मृत घोषित केले तर एक जन गँभीर असल्याचे सांगितले जात आहे.
संजय गजानन गायने वय (22) रा.बोदळ ता.चांदूरबाजार असे गंभीर जखमी झालेल्या yuvkache नाव असून, मृत्यू झालेल्यांमध्ये पांडुरंग रघुनाथ शनवारे वय (30) रा.बोदळ, सतीश सुखदेव शनवरे वय (30, रा.बहिरम कारंजा, रा. सुरेश विठ्ठल निर्मळे वय (25, रा. खरपी), इनोव्हा कार चालक रमेश धुर्वे वय (30) रा. सालेपूर
यात सर्व मृत इनोव्हा कार मधील समावेश आहे,
मोटार सायकल स्वार जखमी चालक प्रतीक दिनेशराव मांडवकर, वय (26) अक्षय सुभाष देशकर वय (26) दोघेही रा. बोदळ, असे सांगितले जात असून, मोटारसायकलवर बसलेले दोघे आणि कारमध्ये बसलेल्या 5 पैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेतील मृत व जखमींना मदत दिली पुढील चौकशी शिरजगाव कसबा पोलिस करित आहे.

Leave a Comment