कालखेड ची कन्या बनली PSI

 

शेगाव प्रतिनीधी अर्जुन कराळे

शेगाव तालुक्यातील कालखेड येथील गणेश चोखंडे यांची मुलगी कु,पूजा हि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन PSI ( पोलीस उपनिरीक्षक) बनली आहे. त्यामुळे कालखेड गावात आनंदाची लाट पसरलेली आहे.

कालखेड येथील पुजा गणेश चोखंडे ह्या विद्यार्थिनीने महाराष्ट लोकसेवा आयोगाची psi पदासाठी परिक्षा दीली होती. या परिक्षेत पुजाने यश संपादन केले असुन ती पोलीस उपनिरीक्षक बनली आहे.

कु. पुजाचे वडील जळगाव जा. तालुक्यातील मडाखेड येथे प्राथमीक आरोग्य केद्रांत शिपाई पदावर कार्यरत आहेत. ग्रामीन भागातील तरुणी पोलीस उपनिरीक्षक पदावर विराजमान झाल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पूजा आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईवडीलाना आणि गुरूंना देत आहे।
ग्रामीन भागातील युवक-युवतींनी पुजाचा आदर्श व प्रेरना घेऊन शैक्षणीक वाटचाल केल्यास यश निश्चीतचं दूर नाही. एवढे मात्र नक्की.

Leave a Comment