Home Breaking News काळे हास्पिटलवर महिलांचा हल्ला दवाखान्याची तोडफोड, डॉक्टर कुटूंबियांना मारहाण

काळे हास्पिटलवर महिलांचा हल्ला दवाखान्याची तोडफोड, डॉक्टर कुटूंबियांना मारहाण

807
0

 

अनिलसिंग चव्हाण

बुलडाणा – साखर खेर्डा पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या मौजे शेंदुर्जन येथील डॉ शिवकुमार काळे यांच्या दवाखान्यावर आज दि 6 नोव्हेंबरचे दुपारी संतप्त महिलांनी हल्ला करुन दवाखान्याची तोडफोड करीत डॉक्टरसह कुटूंबियाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार असे समजते की, पंधरा दिवसांपुर्वी येथील शिक्षक यांच्या बारा वर्षीय मुलाचा बुलडाणा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला तत्पूर्वी सदर मुलावर शेंदुर्जन येथे डॉक्टर काळे यांनी प्रथमोपचार केले होते मात्र डॉक्टर काळे यांनी चुकीचे उपचार केल्याने आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याची तक्रार मृताच्या कुटुंबियांनी सबंधीतांकडे केली होती यामध्ये डॉ काळे यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. पंधरा दिवसानंतर मृतक कुटुंबातील विस ते तिस महिला अचानक डॉक्टर काळे यांच्या दवाखान्यावर धडकल्या व त्यांनी डॉक्टरची कार, दवाखान्याची तोडफोड करायला सुरुवात केली आत घुसून डॉ काळे, पत्नी, मुलगा, मुलगी यांना लाठ्याकांठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली दरम्यान डॉक्टर काळे यांनी घराचे दरवाजे बंद करून आत जीव मुठीत धरून वाचवा वाचवा ची विनवणी करीत होते दरम्यान साखरखेर्डा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सदर महिलांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले असून वृत्त लिहीपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नव्हती.

Previous articleसूनगाव येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या राशी 659 कंपनीच्या विरोधातील तक्रारीवर कृषी अधिकारी यांनी केली शेताची पाहणी
Next articleजळगाव न प चे मुख्य अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे नगरसेवकांचा आत्महत्येचा प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here