काळ्या बाजारात विक्री करिता जात असलेल्या तांदुळाच्या ट्रक वर LCB ची कारवाई, अंदाजे 23,47,300 लाख रुपयांचा माल हस्तगत

 

उषा पानसरे अमरावती
दिनाक 12 जून

अकोला स्थानिक गुन्हे शाखेने अकोला जिल्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम व्याला येथे कारवाई करीत काळ्या बाजारात विक्री करिता जात असलेला ट्रक ताब्यात घेतला असून या प्रकरणात शासकीय तांदूळ काळ्या बाजारात विक्री करीता घेऊन जाणाऱ्या ट्रक चालक व क्लिनर ला ताब्यात घेत त्यांच्या जवळून अंदाजे 245 क्विंटल शासकीय तांदूळ जप्त केला, गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की एका ट्रक मध्ये शासकीय तांदूळ हा तस्करी करून विक्री करिता जात आहे या माहिती वरून गुन्हे शाखेच्या पथकाने रिधोरा जवळील व्याला शिवारात सापळा रचून सदर ट्रक जप्त केला, ट्रकची पाहणी केली असता त्या मध्ये शासकीय राशनच्या तांदुळाच्या मोठा साठा मिळून आल्याने सदर ट्रक हा बाळापूर पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आला, ट्रकची पाहिनी केली असता त्या मध्ये 245 क्विंटल शासकीय तांदूळ मिळून आल्याने पोलिसांनी राजाराम रघुबिर पाल वय 52 वर्ष रा.नागपूर व सरसपाल रामानंद पाल वय 54 वर्ष रा.प्रतापगढ उत्तर प्रदेश याना अटक केली असून त्यांच्या जवळून 5,36,800 किमतीचा ट्रक सह 23,47,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे,सदरची कारवाई पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख , पोहेका दत्ता ढोरे,नापोका विशाल मोरे, पोका संदीप ताले, रवी पालिवाल, श्रीकांत पातोंड यांनी केली.

Leave a Comment