किनगावच्या इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये उत्साहात सुरू झाल्या तालुकास्तरीय क्रिडास्पर्धा. अधिकारी,कर्मचारी मैदानात

 

यावल विकी वानखेडे

यावल : तालुक्यातील डोणगाव येथील इग्लिश स्कुल मध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ ला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. संस्थेचे सचिव मनिष पाटील यांच्या हस्ते उद्दघाटन करण्यात आले.

व दिवसभर येथे विविध स्पर्धा रंगल्या पंचायत समितीचे अधिकारी,कर्मचारी, शिक्षक,शिक्षीका आदींच्या एकूण ३२ संघांचा या स्पर्धेत सहभाग होता.तर दोन दिवस या स्पर्धा चालणार असुन यातील विजेत्यांना जिल्हास्तरीय संघात स्थान मिळणार आहे.

डोणगाव ता. यावल येथील किनगाव रोडवरील इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुल आहे. या स्कुल मध्ये महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद जळगांव व यावल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांच्यासाठी या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आहे.

होते सकाळी ९ वाजेला या दोन दिवशी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गॉड स्मिथ चॅरेटीबल ट्रस्ट संस्थेचे सचिव मनीष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार पाटील होते तर प्रमुख अतिथी मध्ये व्यवस्थापक पूनम पाटील, यावलच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड, शिक्षणाधिकारी नमुद्दीन शेख, क्रीडा समन्वयक के. यु. पाटील, शाळेचे प्राचार्य प्रा. अशोक पाटील, क्रीडाशिक्षक दिलीप बिहारी संगेले सह आदींची उपस्थिती होती.

मोठ्या उत्साहात या ठिकाणी क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली. या क्रीडा स्पर्धेत क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, हॉलीबॉल, बॅडमिंटन, कॅरम अशा विविध प्रकारच्या स्पर्धा रंगल्या यात ३२ संघ तालुक्यातून सहभागी झाले होते.

तसेच या स्पर्धेत जर कोणाला काही दुखापत झाली तर किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. दीपक तायडे, डॉ. जीवन सोनवणे यांचे पथक या ठिकाणी थांबून होते. दोन दिवस या स्पर्धा चालणार आहे पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहात स्पर्धा रंगल्या होत्या.-पुर्ण—फोटो आहे

Leave a Comment