कृषी उत्पन्न बाजार समिती व पर्यावरण संवर्धन संस्थेचा संयुक्त उपक्रम.

 

हिंगणघाट :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महात्मा गांधी जयंतीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट व पर्यावरण संवर्धन संस्था, हिंगणघाटच्या वतीने १०० वृक्ष लागवडीचा भव्य कार्यक्रम कृ. उ. बा. समिति हिंगणघाटच्या नांदगाव येथील गोडाऊन परिसरात पार पडला.
कृ. उ. बा. समितिचे सभापती श्री. अँड सुधीरबाबु कोठारी यांच्याशी पर्यावरण संवर्धन संस्थेने कृ. उ. बा. समिती, हिंगणघाट परिसरात हिरवळ दिसावी याकरिता निवेदन दिलेले होते. यावर सकारात्मक प्रतिसाद देत कोठारी साहेबांनी ५०० झाडांच्या लागवडीची इच्छा व्यक्त केली. त्यातील पहिल्या टप्प्यात १०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
वृक्षारोपण करताना दुर्मिळ होत चाललेल्या व देशी प्रजातींची लागवड करण्यात यावी, असे दिगांबरजी खांडरे यांनी सुचविले होते. त्यानुसार बेल, कवठ, शिवलिंग, कुसूम, जारूळ, बहुनिया, कडूनिंब, अर्जुन, हिरडा, जांभूळ, काटसावर, आंबा ही झाडं लावण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सुधीरजी कोठारी तर प्रमुख अतिथी म्हणून वनश्री दिगांबरजी खांडरे, कृ. उ. बा. समिती समुद्रपूरचे सभापती हिंमतरावजी चतुर, हिंगणघाट बाजार समितीचे संचालक ओमप्रकाशजी डालिया, मधुसूदनजी हरणे,संजयजी कात्रे, नगरसेवक धनंजयजी बकाने, निलेशजी ठोंबरे, समाजसेवक सुनिलजी डोंगरे, प्रा. अभिजित डाखोरे, प्रा. श्रीकृष्ण बोढे, संतोषजी खाडे, नथ्थुजी ढेकरे, जेष्ठ पत्रकार सतिशभाऊ वखरे, राजेश धनरेल, तेजस तडस यांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाचे संचालन बाजार समितीचे सचिव तुकाराजी चांभारे यांनी तर प्रास्ताविक व आभार पर्यावरण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष आशिष भोयर यांनी केले. याप्रसंगी शहरातील सुप्रसिद्ध समाजसेवक मोहन भाऊ कठाने यांचा वाढदिवस वृक्षारोपणासह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हिंगणघाट बाजार समितीचे सर्व कर्मचारी मंडळी तर पर्यावरण संवर्धन संस्थेचे प्रदीप गिरडे, सचिन थुल, उमेश मंगरूळकर, अजय वानखेडे, सतिश नक्षीने, धनराज कुंभारे, राकेश झाडे, प्रा. योगेश वानखेडे, विनोद थुटे, हेमंत हिवरकर, उमेश डेकाटे, राहुल सिंगरु, सचिन एलकुंचवार, पवन डफ, नरेन्द्र मेघरे, साकीब शेख, दर्शन बाळापुरे, रंजित भोमले, प्रमोद माथनकर, यांनी सहकार्य केले. तर रूग्नमित्र गजू कुबडे, विठ्ठल गुळघाने, नितीन क्षीरसागर, चंद्रकांत ननंदकर, दिपक जोशी, आसिफ अली, मोहन पेरकुंडे, सुरज कुबडे, आनंद कांकरिया, सुनिल इंगोले, मनिष चितलांगे, अशोक पवनीकर, पंकज मसतकर, गणेश कुंभारे, संजय कुंभारे आदींची उपस्थिति होती.

Leave a Comment