बोदवड प्रतिनिधी सतीश बावस्कर.
बेटावद बु येथिल शेतकरी गटाने स्थापित केलेल्या कृष्णवंदन शेतकरी उत्पादक कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा दिं ६सप्टेंबर२२ रोजी कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची साठवून व प्रक्रिया करुन अधिक नफा मिळवून शेतकरी सक्षम करण्याच्या उद्देशाने स्थापित केलेली ही कंपनी यशस्वी होईल अशी वाटचाल करीत आहे. परीसरासाठी शेतकऱ्यांना पोखराच्या विविध योजने विषयी डायरेक्ट कुरबान तडवी व सौ अल्पना शिंदे यांनी माहिती दिली.
कापसावरील किड तिची ओळख व व्यवस्थापन या विषयी दिनेश पाटील कृषीसहाय्यक चोपडा यांनी सखोल माहिती दिली. मिश्रपीक पध्दती चे महत्व जैविक शेती व त्याला अधुनिकते ची जोड कशी द्यावी या विषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन अनिल भोकरे उपसंचालक कृषी विभाग यांनी केले.
कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी अभिमन्यु चोपडे, कृषी पर्यवेक्षक संतोष चिमनकर, या समुहाचे जनक स्वप्निल पाटील, विजय चौधरी, जेष्ठ मार्गदर्शक मांगीलाल गील, माजी जि प सदस्य नामदेव मंगरुळे, अंबादास चौधरी, भगवान महाजन, अशोक सत्रे, सुभाष बिंदवाल व कंपनीचे सदस्य, महिला व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी स्थापन केलेली शेतकरी कंपनी बेटावद बु।।