कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शिवसेना महिलांचे स्नेह मिलन (आढावा बैठक) कार्यक्रम

 

हिंगणघाट :- 9 ऑक्टोंबर
रविवारला ठीक दुपारी 12:00 वाजता शिवसेना हिंगणघाट शहर महिला पदाधिकारी व शिवसैनिक यांच्यातर्फे वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख श्री .बाळाभाऊ राऊत तथा पूर्व विदर्भ महिला संघटीका प्रा. शिल्पाताई बोडखे यांच्या आदेशाने तथा वर्धा जिल्हा समन्वयक डॉ.उमेश तुळसकर, तथा उपजिल्हाप्रमुख श्री.राजेंद्र खूपसरे ,तसेच महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सौ. संगीता कडू ,कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अनिताताई येवले, तालुकाप्रमुख सतीश धोबे, शहरप्रमुख सतीश ढोमणे, समद्रपूर येथील महिला उपजिल्हा संघटिका श्रीमती मंदाताई चौधरी यांच्या उपस्थितीत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महिलांचे स्नेह मिलन (आढावा बैठक) कार्यक्रम तुळसकर सभागृह येथे घेण्यात आला .कार्यक्रमात मुख्य अतिथी प्रा. शिवमती सिमाताई बोके महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड तथा प्राचार्य सौ. नयनाताई तुळसकर यांच्या प्रमुख व्याख्यान महिलांना लाभले. प्रास्ताविक सिमाताई गलांडे यांनी केले .व्यासपीठावर ज्येष्ठ नगरसेवक श्रीधर कोटकर यांनी सभेत सन 1966 पासून जन्माला आलेला शिवसेना पक्ष त्याचे बोधचिन्ह धनुष्यबान हे निवडणूक आयोग यांनी रद्द केले. चिन्ह गोठवले असले तरी माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यासोबत हिंगणघाट येथील एकनिष्ठ महिला शिवसैनिक व पदाधिकारी संघटना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे त्या ठिकाणी एकमताने निर्णय घेण्यात आला. भाजप सरकारने या देशाच्या स्वायत्त संस्था जसे ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग ,न्यायालय यांचा आधार घेतला असला तरी ,शिवसेना पक्ष हा न डगमगणारा आहे पुन्हा उभारी घेईल .तथा संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष सौ . प्रतिभाताई पडोळे उपस्थित होते त्यांनीही सभेत मार्गदर्शन केले ,सौ .नीताताई धोबे यांनी हिंगणघाट नगरपरिषद मधील प्रश्न व कार्य याबद्दल महिलांना मार्गदर्शन केले,तसेच स्थानिक आमदार यांनी पैश्याच्या जोरावर लोकांना खरीदी करतो असा अहम त्यांना झाला आहे . तो तोरा या वेळेस दाखुन दयाचे आहे. तर मंदाताई चौधरी माजी जिल्हा परिषद सदस्या यांनी जिल्हा परिषदेतील ग्रामीण भागातील कार्य, प्रश्न व संघटन याबद्दल विस्तृत माहिती महिलांना दिली. त्यानंतर महिला जिल्हा संघटिका यांनी पक्ष संघटन बद्दल माहिती महिलांसमोर सांगितले .तसेच उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे यांनी स्त्री शक्ती व शिवसैनिक मिळून काम करून पुढे आपण उद्धव साहेबांसोबत खंबीरपणे उभे राहून असेच कार्य करत राहू असे आश्वासित केले .वर्धा जिल्हा समन्वयक डॉ. उमेश तुळसकर यांनी सभेत मोलाचे मार्गदर्शन केले जिल्ह्यात शिवसेनेमध्ये समन्वय साधावा असेच पुढे कार्यक्रम महिलांचे मेळावे, आरोग्य शिबिर,कार्य -शाळा घेत राहा. कार्यक्रमात आभार प्रदर्शन तालुका संघटिका सौ .माधुरी खडसे यांनी केले . सूत्रसंचालन श्री प्रकाश अनासाने उपतालुकाप्रमुख हिंगणघाट यांनी केले. या कार्यक्रमात नगरसेवक मनीष देवडे, भास्कर ठवरे, सौ संगीता ताई वाघमारे, ,शंकर मोहम्मारे ,उप शहर प्रमुख संजय पिंपळकर, जयंत रोहनकर, शंकर झाडे ,गजानन काटोले, विभाग प्रमुख सचिन मुळे, मोहन तुमराम , अविनाश धोटे, रुपेश काटकर तसेच महिला पदाधिकारी सौ. नीलिमा मोहम्मारे, सौ राजेश्री देवडे, सौ. सारिका अनासाने,सौ. प्राची पाचखेडे, सौ. संगीता वाघमारे,सौ तुमराम ,आशाबाई टेकाम, सौ.रश्मीताई बाकडे,सौ. रुपाली धनवन,सौ. गीता क्षीरसागर, सौ. पांडे ताई, सौ. मुनघाटे,सौ. सुमित्रा पारधे,सौ.किरणताई खुरपडे, .विद्याताई बदाडे ,सौ. सुनीता सुपारे, सौ. स्वाती पिंपळकर ,सौ.मंगला ठेवरे,सौ. प्रियंका धोटे,सौ. मीना काटकर,सौ. धनश्री क्षिरसागर, सौ. सुवर्णा वैद्य,सौ. स्वेता मानकर,सौ. राणी काटकर,सौ. रजनी झाडे,सौ. वैशाली लालटेनवार,सौ. संजना मानकर, मंदा धोबे,सौ. संगीता चौधरी, सौ. भरती नाईक सौ. कलावती निखाडे,सौ प्रियांका मून,सौ. सुटे, सौ. प्रतिभा धोबे, सौ. रिटा बाराहाते, सौ. वनिता झिबल,सौ. पूजा आवारी,सौ. वर्षा धोबे,सौ. उज्वला भगत,सौ.शिल्पा होरे, सौ.वृषाली खुरपुढे,सौ. प्रतिभा गेडेकार,सौ. अरुणा झाडे,सौ. प्रियांका घोडे,सौ. कुंदा गिरडकर, सौ.नेहा शाहू, सौ. सुनीता तेलंग,सौ. मनीषा चौधरी, सौ. शीतल चौधरी,सुरेश चौधरी,मनोज मिसाळ, बंटी वाघमारे,दिगंबर दुरत,अनिल लालटेनवार, प्रफुल क्षीरसागर, दिनेश धोबे, मोहन तुमराम, रुपेश काटकर,नितीन वैद्य,भास्कर मानकर, अविनाश धोटे, गोवर्धन शाहू व समस्त महिला शिव सैनिक मोठया संख्येने उपस्तीत होते.

Leave a Comment