Home Breaking News कोरपावली ग्रामपंचायतच्या सरपंचपदी कॉंग्रेसचे विलास अडकमोलतर उपसरपंचपदी हमीदा पटेल यांची निवड

कोरपावली ग्रामपंचायतच्या सरपंचपदी कॉंग्रेसचे विलास अडकमोलतर उपसरपंचपदी हमीदा पटेल यांची निवड

443
0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

यावल तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला असुन ,सरपंचपदाची माळ काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हा मीडिया प्रमुख तरूण पदाधिकारी विलास नारायण अडकमोल यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंचपदी काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांच्या काकू हमीदाबी पिरण पटेल यांची मतदानाव्दारे निवड करण्यात आली आहे . यावेळी उपसरपंचपदा साठीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या हमीदाबी पिरण पटेल यांना ६तर प्रतिस्पर्धी दीपक चुडामण नेहेते यांना ५मते मिळाल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी पी. आर. कोळी यांनी विजयी घोषीत केले . काँग्रेसच्या हमीदाबी पटेल यांचा १मताने विजयी झाला .यावेळी ग्राम पंचायत सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी,ग्राम पंचायत सदस्या हफशान तडवी, हुरमत तडवी, दीपक नेहेते, कविता कोळंबे, भारती नेहेते, सपना जावळे, आफरोज पटेल हे सर्व ११ सदस्य सरपंच उपसरपंच निवडीच्या बैठकीला उपस्थित होते . या निवडणुक निर्णय अधिकारी यांना याकामी ग्रामसेवक प्रवीण सपकाळे यांनी सहकार्य केले ,यावेळी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा पॅनल प्रमुख पिरण पटेल, काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते बारसु रामदास नेहेते, नारायण अडकमोल, ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल, मुक्तार पटेल, इस्माईल तडवी, प्रेमचंद महाले, संदीप नेहेते, शांताराम महाजन,अजित तडवी, अब्दुल तडवी ,उमेश जावळे ,इकबाल मेंबर, गफ्फार मेंबर, सिकंदर तडवी, मुकदर तडवी, मुज्जफर पटेल, कय्युम पटेल, महंमद पटेल, जावेद पटेल,सुनील अडकमोल, भीमराव इंधटे, विनोद अडकमोल, भैय्या अडकमोल, उपस्थित होते पोलीस निरीक्षक सुधीर पाटील सहित सुशील घुगे, अस्लम खान सह पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला बंदोबस्त चोख ठेवला, या निवडीबद्दल सरपंच , उपसरपंच यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीपभैय्या पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी, जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, अजबराव पाटील, हाजी शब्बीर खान , संदीप सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे.

Previous articleसरपंच ग्रामपंचायत मध्ये बसताच जण हितार्थ कामावर एक्शन,
Next articleयावल ते किनगाव रस्ता बनला मृत्युचा सापळा दोन वर्षात २२ निरपराधांचा झाला अपघातात दुदैवी मृत्यु सा . बा .वि . भोंगळ कारभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here