Home Breaking News कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ग्रामीण भागात आगामी सण-उत्सव साजरे करत असताना शासनाने घालुन दिलेल्या...

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ग्रामीण भागात आगामी सण-उत्सव साजरे करत असताना शासनाने घालुन दिलेल्या नियम व अटींचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन ठाणेदार माधवराव गरुड यांनी केले .

316
0

 

दिनांक ७ नोव्हेंबर ला पोलिस स्टेशन बोराखेडी येथे आयोजित पोलिस पाटील कार्यशाळेत ते बोलत होते .तज्ज्ञांच्या मते कोरोनाचे महाभयंकर संकट अद्यापही टळलेले नसून नागरिकांना तोंडाला मास्क लावण्याचे निर्बंध घालावे .वयोवृद्ध व लहान बालके यांना बाहेर न फिरण्याबाबत आश्वस्त करावे असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पुर्वमैनस्यातून सोयाबीन व तत्सम पिकांच्या सुडींना आगी लावण्याचे काम काही समाजकंटकांकडून होत आहे असे प्रकार आपल्या हद्दीत रोखण्यासाठी पोलिस पाटील बांधवांनी कसोशीने प्रयत्नरत राहून संशयितांची नावे पोलिस स्टेशनला कळवावीत. ग्रामीण भागात चोरीच्या घटना रोखण्यासाठी ग्रामपंचायत व तत्सम कार्यालयांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी संबंधितांना प्रेरित करावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यशाळेस तालुक्यातील बहुसंख्य पोलीस पाटील यांची विशेष उपस्थिती होती .यावेळी पोलिस पाटीलांच्या अडी अडचणींसंदर्भात चर्चा होऊन त्यात मार्गदर्शन झाले .
ठाणेदार माधवराव गरुड यांच्या कारकिर्दीस आज
दोन वर्ष पूर्ण झाले. या कार्यकाळात पोलिस पाटील बांधवांना योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य लाभले .याचे औचित्य साधून पोलीस पाटील संघटनेचे बुलडाणा
जिल्हाध्यक्ष विठ्ठल मनोहर पाटील यांनी ठाणेदार माधवराव गरुड यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला .
आज बोराखेडी पोलिस स्टेशनला नवीनच रुजू झालेले दुय्यम पोलिस निरीक्षक श्री भुसारी यांचा जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुधाकर तायडे यांनी सत्कार केला .यावेऴी मोताळा तालुकाध्यक्ष संतोष ढोण पाटील गावकामगारचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र भामद्रे तालुकाध्यक्ष बळीराम शेळके गजानन नारखेडे यांसह बहुसंख्य पोलीस पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन रामराव पंडीत पाटील यांनी केले.

Previous articleआदर्श ग्राम वकाना ग्रामस्थांनी केला शंकर पुरोहित यांचा राज्यस्तरीय आरोग्य मित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार
Next articleभाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी दशरथ बनकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here