Home विदर्भ कोरोना काळातही स्वच्छतेचा अभाव नालीचे दुषित पाणी घुसतय घरात

कोरोना काळातही स्वच्छतेचा अभाव नालीचे दुषित पाणी घुसतय घरात

334
0

 

अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे

 

तेल्हारा तालुक्यातील अडगांव बु शिवाजी नगर येथील नागरिकांनी अनेक वेळा ग्राम पंचायत कार्यालयात स्वच्छते बाबत तक्रारी केल्या मात्र निगरगट्ट प्रशासनाने त्यांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गावातीलच रहिवासी अपंग महिला कल्पना सुरेश सित्रे ह्यांच्या घरासमोर बांधकाम केलेली नाली ही चुकीच्या पद्धतीने बांधल्याने सदर नालीतील पाणी हे सित्रे ह्यांच्या घरात शिरत आहे व त्या पाण्यामध्ये नालीतील किडे त्यांच्या घरात येतात त्यामुळे त्याच्या घरातील व्यक्तीची प्रकृती वारंवार बिघडत असून कोरोना काळात त्यांच्या परिवारावर प्रशासनाच्या चुकीमुळे कृत्रिम संकट निर्माण झाले आहे.
ह्या बाबत त्यांनी ग्राम पंचायत सचिव ,सरपंच, आरोग्य विभाग, पंचायत समिती सदस्य, गट विकास अधिकारी यांना निवेदने दिली परंतु कोणत्याच प्रकारची दखल यांनी घेतली नाही पर्यायी पंचायत समिती तेल्हारा येथे उपोषणाला बसण्याची वेळ आली परंतु पंचायत समिती सदस्य व गट विकास अधिकारी यांनी त्यांची समजूत काढून उपोषणाला स्थगिती दिली व तुमचे काम उद्याच करतो अश्या प्रकारचे आस्वासन दिले मात्र आज 4 महिन्यापासून ही अपंग महिला न्यायासाठी प्रशासनाचे दार ठोकत आहे परंतु ह्यांची हाक झोपी गेलेल्या म्हणावे की झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला कधी ऐकू येईल. स्वच्छतेचे धडे देणारे शासन प्रशासन काही पाऊल उचलेल की त्यांना डबक्यातच राहावे लागेल. व चुकीच्या पद्धतीने बांधकाम केलेल्या नालीचे बिल कसे काढण्यात आले याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे.तसेच दोषींवर कारवाई ची मागणी नागरिक करत आहेत.

Previous articleअतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची प्रहारची मागणी- ज्ञानेश्वर घोडके
Next articleरात्री पायी फिरत असतांना समोरून आलेल्या आयशर ट्रकने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here