कोरोना काळात रक्तदान शिबिर घेऊन ८१ बॉटल रक्त रक्तपेढीला दिल्याबद्दल अमर पाटील यांचा सत्कार

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

कोरोना काळात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे सरकारने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत संभाजी ब्रिगेडच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त नांदुरा येथे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील यांनी त्यांचे सहकारी व मां जिजाऊ सावित्री विचारमंच मिळून रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात तब्बल ८१ बॉटल रक्तदान झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणत रक्तासाठी उपलब्ध करून शासकीय रुग्णालय खामगाव यांना सहकार्य केल्याबद्दल या कार्याची दखल घेत शासकीय रक्तपेढी खामगाव यांच्या मार्फत अमर रमेश पाटील यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Leave a Comment