कोविड संसर्ग आढावा बैठक
अजहर शाह मोताळा प्रतिनिधी
मोताळा:-दि.17: गत काही दिवसांमध्ये कोरोना बाधीतांची संख्या कमी झालेली दिसून आली. ही दिलासादायक बाब असली तरी कोरोना चाचण्यांची संख्या कमी झाल्यामुळे ही संख्या कमी तर आली नसेल, याबाबत पडताळणी करावी. पुढील काळात दररोज एक हजार चाचण्या झाल्या पाहिजे. प्रयोगशाळाही पुर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने दररोज एक हजार चाचण्यांचा टप्पा गाठला जाईल, अशा प्रकारे कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात कोविड संसर्ग विषयक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री आढावा घेताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस राममूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ तडस, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील ग्राम स्तरावरील आरोग्य यंत्रणेला पुन्हा सक्रीय करून बाधीत रूग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांच्या चाचण्या कराव्यात. चाचण्यांचा वेग वाढविण्यात यावा. उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय व मोठ्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड चाचणीची व्यवस्था करण्यात यावी. नागरीकांना दूरवर जाता कामा नये. गावाजवळच कोविड चाचणीची व्यवस्था केल्यास चाचण्या वाढतील. चाचण्या वाढविण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी यावेळी दिले. याप्रसंगी संबंधित विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते.
************
कोरोना अलर्ट : प्राप्त 414 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 121 पॉझिटिव्ह
42 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.17: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 535 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 414 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 121 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 117 व रॅपिड टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 203 तर रॅपिड टेस्टमधील 211 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 414 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव शहर : 7, शेगांव तालुका : गौलखेड 1, कायगांव 1,कठोरा 1, दहीगांव 1, बुलडाणा शहर : 4, बुलडाणा तालुका : साखळी बु 1, नांद्राकोळी 1,वालसावंगी 1, चौथा 1, धाड 1, चिखली शहर : 6, चिखली तालुका : हिवरा गडलिंग 1, हातणी 2, दे. राजा शहर : 14, दे. राजा तालुका : दे. मही 1, नागणगांव 1, पोखरी 1, पाडळी 1. मेहकर तालुका : हिवरा आश्रम 2, खंडाळा 1, उकळी 1, बाभुळखेड 2, लव्हाळा 1, आरेगांव 1, मेहकर शहर : 11, सिं. राजा तालुका : दुसरबीड 1, निमगांव वायाळ 7, शेलगांव राऊत 1, साखरखेर्डा 4, सिं. राजा शहर : 1, मलकापूर शहर : 8, मलकापूर तालुका : उमाळी 1, संग्रामपूर तालुका : एकलारा बानोदा 1, मोताळा तालुका : तळणी 2, बोराखेडी 2, लोणार शहर : 2, लोणार तालुका : सुलतानपूर 1, किन्ही 1, पिंपळखुटा 2, जळगांव जामोद शहर : 4, खामगांव शहर : 6, खामगांव तालुका : टेंभूर्णा 4, नांदुरा तालुका : पिंपळखुटा धांडे 2, घोटा 1, पोटळी 1, मूळ पत्ता विल्हे ता. चोपडा जि. जळगांव 1, काजेगांव ता. बाळापूर जि. अकोला 1, भोकरदन जि. जालना येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 121 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 42 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : लोणार : 12, मलकापूर : 2, नांदुरा : 2, शेगांव : 1, दे. राजा : 1, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 19, मोताळा : 1, चिखली : 4.
तसेच आजपर्यंत 36007 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 7865 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 7865 आहे.
आज रोजी 433 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 36007 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8424 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 7865 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 446 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 113 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.