गोंदिया-शैलेश राजनकर
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मध्यंतरी कमी झाली होती पण आता रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.पण कोरोना योद्धा डॉक्टरांची चमू आपली जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित रुग्णांची सेवा करत असतानाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बालरोग विभागामध्ये DCH या पदव्युत्तर शिक्षण सुरू असलेल्या ३७ वर्षीय तरुणी डॉ.रोहिणी गजभिये यांचा कोरोनामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना दुर्दैवी मृत्यू झाला.डॉ.रोहिणीचा मृत्यू हा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय सेवा देतांना कोरोना योद्धाचा पहिलाच बळी आहे.त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्वत्र शोककळा पसरली आहे.डॉ.रोहिणी ही १३ नोव्हेंबर ला कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पण कोरोनाबधितांची दिवसरात्र सेवा करणारी खरी कोरोना योद्धा आपल्या आयुष्याची लढाई मात्र हरली आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या खऱ्या कोरोना योद्धा डॉ.रोहिणी गजभिये यांना सुर्या मराठी परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
सर्वांनी कोरोना विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आपले व आपल्या परिवाराचे कोरोना पासून रक्षण करावे.