कोळवद गावातील महिलांनी कायमच्या दारूबंदीसाठी सरपंचांना दिले निवेदन

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील कोळवद ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात गेल्या अनेक दिवसापासून खुलेआम राजरोसपणे गावठी दारूची सर्रास विक्री होत असुन , सार्वजनिक ठीकाणी सहज मिळणाऱ्या या दारूमुळे मोलमजुरी करणारे नागरीकांपासुन तर अनेक तरुण हे व्यस्नाधीन झाले असुन अनेकांचे संसार उद्धवस्थ झाले असुन , गावातील दारूबंदीसाठी महीलांनी पुढाकार घेतला असुन , या संदर्भात महीलांनी सरपंच यांची भेट घेत त्यांनी गावातील गावठी दारू कायमची बंद करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे . कोळवद ग्रामपंचायतचे सरपंच याकुब तडवी यांच्याकडे तक्रार निवेदन दिले असुन या निवेदनावर परविन फकीरा तडवी , यशोदा सपकाळे , आशा रमजान तडवी , सोनाली रतनलाल सोळुंके यांच्यासह गावातील महीलांनी आपल्या स्वाक्षरी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , या गावात गावठी हातभट्टी दारूचे ११ ठीकाणी अड्डे असुन , गावातील सार्वजनिक ठीकाणी सहज मिळत असलेल्या दारूमुळे तरूण पिढी ही फार मोठया प्रमाणावर व्यसनाधिन होत असुन , गावातील असंख्य पुरुष हे दारू पिऊन आपल्या कुटुंबाला व गल्लीतील लोकांना रात्री झोपु देत नाहीत . या सर्व प्रकारामुळे अनेक ग्रामस्थांचे कुटुंब उध्वस्त झाले असुन , ही दारूडी मंडळी दारूच्या नशेत गल्लीतील लोकांना गालिच्छ भाषेत शिवीगाळ करून गोंधळ घालतात, दारूच्या व्यसनामुळे अनेक जणांचा व तरूणा मृत्युमुखी पडलेले आहे . दारू पिणारे हे दारूच्या नशेत आपल्या पत्नी व कुटुंबातीत मंडळीला मारहाण करतात , तरी गावातील कुटुंबप्रमुख प्रथम नागरीक म्हणुन सरपंच यांनी आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी गावातील दारू तात्काळ बंद करावी अशी मागणी केली आहे . यावल शहरासह तालुक्यात सर्वत्र गावटी हातभट्टीची व अत्यंत घातक रसायनाद्वारे तय्यार करण्यात येणारी पन्नीची दारू खुलेआम विक्री जात असुन , या पन्नी दारूच्या आहारी गेल्याने अनेक तरूण हे मृत्युच्या वेटींग लिस्टवर असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. पन्नीची दारू व हातभट्टीची गावटी दारूच्या विक्रीवर तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने बंदी घालावी अशी ही मागणी होत आहे

Leave a Comment