प्रतिनिधी सचिन वाघे
येरला :- येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती “बालिका दिन” म्हणून साजरी करण्यात आला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. श्री जयंत कातरकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती येरला हे उपस्थित होते तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य केंद्र कर्मचारी व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मा. जयंत कातरकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांना यांच्या हस्ते व उपस्थितांतर्फे करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय कुंभारे यांनी केले.
त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली व त्यांच्या स्त्री शिक्षणाविषयी त्यांचे कार्य याविषयी माहिती सांगितली त्यानंतर शाळेचे विद्यार्थिनी अनिका सोनटक्के, आर्य बोधे, स्नेहल महल्ले ,भावना उमाटे, नव्या साळवे, नंदिनी बनकर या सर्व विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती सांगितली त्यानंतर शाळेचे शिक्षक श्री पेंदोर सर यांनी मुलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनाविषयी तसेच त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती सांगितली.
तसेच शाळेचे शिक्षक श्री बारापात्रे सर यांनी सुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची स्त्री शिक्षणाविषयी व त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती सांगितली त्यानंतर अध्यक्ष भाषणामध्ये माननीय श्री जयंतराव कातरकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली व मुलांना शिक्षणाचे महत्त्व समजून सांगितले आपण सर्व विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन चांगले कार्य करावे असे शुभेच्छा दिल्या तसेच शाळेचे शिक्षक श्री अंकुश बारापात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा उपस्थित सर्वांनी व विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पाल मॅडम यांनी केले