अजहर शाह
मोताळा तालुका प्रतिनिधी
कोरोना काळात जोपासली सामाजिक बांधिलकी
बुलढाणा :- जगभरात कोरोना आजाराने थैमान घातले असुन जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले असुन कोरोना आजाराचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार युद्ध पातळी वर कार्य करीत आहे असे असतांना कोरोना ला आपल्या पासुन दूर ठेवण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देत आहे यासाठी च योग्य,व्यायाम,मैदानी खेळ अश्या वेगवेगळ्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होत असते या करिता क्रांती क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने खेळाडूंना क्रीडा साहित्याचे वाटप करून कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जोपासत खेळाडु चा आत्मविश्वास उचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न क्रांती क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे
क्रांती क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व जनार्दन ठाकरे यांनी नेहमीच खेळाडूंना विविध मैदानी खेळा साठी प्रोत्साहित केले असल्याची प्रतिक्रिया यावेळी स्व जनार्दन ठाकरे याचे पुत्र वैभवदीप ठाकरे यांनी दिली क्रांती क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रमामुळे अनेक खेळाडू नी राज्यस्तरा पर्यत मजल मारली असुन अनेक खेळाडु शासकीय सेवेत विविध पदावर कार्यरत आहेत मा मुकेश रेड्डी यांच्या पुढाकाराने क्रांती नगर बुलढाणा येथील खेळाडूंना विधी तज्ञ अँड संतोष वानखेडे यांच्या हस्ते क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी क्रांती क्रीडा व साहित्य मंडळाचे पदाधिकारी खेळाडूमोठ्या संख्येने उपस्थित होते