क्रांती दिनी मुस्लिम शाह फकीर समाज संघटना करणार रास्ता रोको

 

मुस्लिम शाह फकीर या जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गात करण्याची मागणी

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

बुलढाणा. राज्यातील मुस्लिम शाह फकीर या जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गात करण्यात यावा, या मागणी करिता मुस्लिम शाह फकीर समाज संघटना महाराष्ट्र च्या वतीने क्रांती दिन 9 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा स्तरीय रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे

या बाबतचे निवेदन आज गुरुवार दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. मा. मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, राज्यातील मुस्लीम शाह फकीर या जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गामध्ये महाराष्ट्र शासनाने अग्रक्रमाने करावा,

या महत्वपुर्ण मागणी बाबत राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आली.
परंतू राज्यातील शासनाने त्याची अद्यापपर्यंत कोणतीही दखल न घेतल्यामुळे राज्यात मुस्लीम शाह फकीर समाजामध्ये प्रचंड रोष आहे.
शासनाने या मागणीच्या संदर्भात संघटनेने वेळोवेळी दिलेले निवेदने व पुरावे याची दखल न घेतल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात क्रांती दिन दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी पासून जिल्हाव्यापी “रास्ता रोको, जेल भरो आंदोलन सुरु करण्यात येत आहे.

शासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी निवेदनाच्या अंती करण्यात आली आहे.
यावेळी निवेदनावर संस्थापक अध्यक्ष के.जी.शाह, संस्थापक महासचिव जाकीर शाह, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लुकमान शाह,विदर्भ अध्यक्ष मुश्ताक शाह ,रहीम मकबुल शाह, तहेसिन शाह, मन्सुर शाह, अकील शाह, शाहीद शाह, एजाज शाह,

इब्राहिम शाह,अलिम शाह मोबिन शाह, इरफान शाह, हसन शाह, बशीर शाह, अबुबकर उर्फ अली शाह, सलमान शाह, कासम शाह, मोबीन शाह, सिकंदर शाह, सईद शाह यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Comment