खामगाव भालेगाव तात्काळ पंचनामे करा निलेश देशमुख थेट शेतकरयाच्या बांधाव र पोहचले व नुकसान ग्रस्त शेतकरयाची पिकांची पाहणी केली …… .पावसाचा तडाखा…पिके उध्वस्त..

0
345

 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चालू असलेल्या अतिपावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खामगाव तालुक्यातील भालेगाव तेथे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावला आहे. सोयाबीन,कपाशी,मका,ज्वारी व अन्यपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी तहसिलदार साहेबांना विनंती आहे तात्काळ पंचनामे करुन शेतकरी यांना आर्थिक मदत देण्यात यावी आज दोन दिवस उलटुन गेले असुन कुठलाही अधिकारी पंचनामा करण्यासाठी आलेला नसुन लवकरच पंचनामे करुन मदत जाहीर करावे अन्यथा शेतकर्यांना सोबत घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना नाईलाजाने आंदोलन करावे लागेल असा ईशारा स्वाभिमानी चे विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष निलेश देशमुख यांनी दिला यासंदर्भात आज भेट घेवून शेतकऱ्यांना हे.25 हजार रुपये नुकसान भरपाई मागणी केली.यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित, होते निलेश गवळी,विजय भाऊ चोपडे, गोपाल सावरकर, विजय कोल्हे, संदिप सुरडकर,अजय बुजाडे व समस्त शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here