खामगाव.शहरातील तीन दुकानांना आग; लाखोंचा माल जळून खाक

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

खामगाव शहरात आज, बुधवारी लागलेल्या आगीत ३ दुकानांतील लाखोंचे साहित्य खाक झाले. तीन ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी ही आग नियंत्रणात आली. टिळक मैदान परिसराला लागून असलेल्या एका दुकानाला प्रारंभी आग लागली. पहाता पहाता या आगीने रौद्ररूप धारण केल्याने बाजूच्या दुकानालाही आग लागली.

टिळक मैदान परिसरातील दुकानांच्या पाठीमागे कचऱ्याचे ढिगार असून या कथन्याला काहीजण आग लावून पेटवून बेतात. त्यातून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

आहे. सुहाग बंगल्स अंड कॉस्मेटिक ज्वेलरी या दुकानाला आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर बाजूच्याच मेडिकलच्या दुकानाला ही आग लागली. खामगावसह शेगाव आणि नांदुरा येथील अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले.

Leave a Comment