खासदार प्रतापराव जाधव कोरोना पॉझिटिव्ह;

 

आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. परंतु, यापूर्वीच लोकसभेचे १७ खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, यात बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचाही समावेश आहे. खासदार जाधव यांची १२ सप्टेंबर रोजी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती श्री. जाधव यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिली. खासदार जाधव यांना सध्यातरी कोरोनाची कोणतेही लक्षण नसल्याने दिल्लीत त्यांच्या निवासस्थानीच त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. त्यांची तब्येत ठणठणीत असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आज पहिल्या दिवशी प्रतापराव जाधव यांनी अधिवेशनाला हजेरी लावली नाही.

Leave a Comment