खेळ मांडीयला महिला भगिणीसाठी कार्यक्रम संपन्न:

 

(तुकाराम राठोड)

जालना-राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक,अध्यक्ष व माजी केद्रीयमंत्री अशा सर्व क्षेत्रात पदभुषविलेले पद्मभुषण श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घनसावंगी येथे विविध कार्यक्रम आयोजित केले होते.

यापैकी खेळ मांडीयला हा एक कार्यक्रम फक्त महिला बघिणीसाठीचं या कार्यक्रमाचा खरा उद्देश आमच्या महिला बघिणींच्या चेहऱ्यावर हसू ,आनंद पाहुन सार्थक झालेले दिसले.

आमच्या महिला बघिणींना आपल्या रोजच्या कामाच्या व्यापातुन थोडा आनंदाचे क्षण उपभोगता यावे यासाठी आपले कर्तव्यदक्क्ष माजी आरोग्य मंत्री राजेशभैय्या टोपे साहेब यांच्या सुविद्य पत्नी सौ.मनिषाताई राजेश टोपे यांचे आपल्या समाजाप्रती सतत काहीना काही चालू असते.

नेहमीचं पुरुषमंडळीसाठी कार्यक्रम होत असतात. एखाद्या कार्यक्रम महिलासाठी व्हावा यामध्ये सर्व महिलांना सहभागी होता आले पाहिजे यासाठी त्यांनी महिला बघिणींसाठी मराठवाड्यात पहिल्यांदा एका आगळ्यावेगळ्या होम मिनिस्टर फेम अंतर्गत सुप्रसिद्ध आदेशजी बांदेकर प्रस्तुत खेळ मांडीयला हा कार्यक्रम आयोजित केला.महिला बघिणींच्या या दोन ते तीन तासात वेगवेगळ्या विभागातुन ,समाजातुन आलेल्या महिला मंडळींनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवून जणु एका प्रकारे नविन विक्रमचं घडवला आहे.

या तीन तासात रोजचे दुःख विसरून माय माऊलींनी निखळ आनंद घेतला यातचं या झालेल्या कार्यक्रमाचे सार्थक झाले आहे.पहिले बक्षीस ,दुसरे बक्षीस,तीसरे बक्षीस व काही शेकडो प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात आली.

पण यापेक्षाही काही महिला बघिणींनी आपले मत व्यक्त करतांना आम्ही बक्षीस मिळाली नाही म्हणुन बिलकुल नाराज नाही क्षणभर आनंद मिळाला हेचं खुप झाले.असे महिलासाठी कार्यक्रम नेहमीच आयोजित करण्यात यावे अशा भावनाही काही महिलांनी व्यक्त केल्या आहेत.असे कार्यक्रम घेतल्याबद्दल सौ.मनिषाताई टोपे व राजेशभैय्या टोपे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Comment