Home बुलढाणा गजानन महाराज मंदिराच्या प्रथम प्राणप्रतिष्ठा वर्धापनदिन निमित्त महाप्रसादाचे वाटप

गजानन महाराज मंदिराच्या प्रथम प्राणप्रतिष्ठा वर्धापनदिन निमित्त महाप्रसादाचे वाटप

585
0

 

अजहर शाह मोताळा

मोताळा :- स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ उभारण्यात आलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिराच्या प्रथम प्राणप्रतिष्ठा वर्धापनदिना निमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री च्या भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेतला जागतिक महामारी असलेल्या कोरोना आजाराने भक्तांना देवा पासुन प्रदीर्घ अश्या लॉकडाउन काळात मंदिर बंद असल्याने दूर ठेवले होते परंतु आता हळूहळू परिस्थिती पूर्व पदावर येत असताना लॉकडाउन काळात भक्त आणि देवा मध्ये झालेला दुरावा कमी करण्यासाठी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ उभारलेल्या श्री च्या भव्य मंदिरात गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात भक्ती पूर्ण वातावरणात भव्य शोभायात्रा काढून श्रीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती
याचं श्री गजानन महाराज यांच्या प्रथम मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्धापनदिन निमित्त भक्तांची भगवंताची भेट व्हावी व लॉकडाउन काळात झालेला दुरावा दूर करण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने पंचक्रोशीतील भाविक-भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी मंदिर समितीचे पदाधिकारी सदस्य यांनी कोरोना आजाराचे गांभीर्य लक्षात घेता मंदिर परिसरात विविध उपाययोजना केल्या होत्या

Previous articleशेतातून ४५,००० रुपयाचे बैल चोरीला, पांग्री काटे येथील घटना !
Next articleसाखरखेर्डा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार जितेंद्र आडोळे न्यायाधीशाच्या भूमिकेत ! अनेक घरगुती तंटे जागच्याजागी मिटवले !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here