गट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे येथील ई.क्लास जमिनीवरील अतिक्रमण काढले

 

प्रतिनिधी
अशोक भाकरे

अकोला -: जिल्हा अधिकारी अकोला यांच्या आदेशानुसार, तहसीलदार यांच्या उपस्थितीत
ई.क्लासच्या जमीनीवरील अतिक्रमण करूण पेरलेली पिके महसुल विभागाच्या धडक पथकाने निष्कासीत केले,
मोरगाव भाकरे व बाखराबाद दोन ते तिन एकर जमीनीवरील काहींनी अतिक्रमण करून पेरणी केली होती. मात्र आज अतिक्रमण हटवा मोहिमेत ही पिके जमीन दोस्त करण्यात आली व तसेच इ. क्लास जमिनीवर तहसीलदार सुनील पाटील यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली व यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल पथकाने ही कारवाई केली मोरगाव भाकरे येथील सरकारी ई.क्लास गायरान जमिनीवर काही नागरिकांनी अतिक्रमण केले होते सदर चे अतिक्रमण मंडळ अधिकारी कचरे, तलाठी दिपक पाटणकर ग्रामसेविका विद्या वाघ, सरपंच उमा ज्ञानेश्वर माळी, उपसरपंच अर्चना गजानन चोपडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य अशोक भाकरे व ग्रामपंचायत सदस्य पोलिस पाटील दत्तात्रय माळी, उरळ पोलीस स्टेशनचे एपीआय मोरे व सर्व कर्मचारी उपस्थित व तसेच सर्व प्रत्रकार अभिजीत फंडाट गणेश भाकरे पंगज सिरसाठ अशोक भाकरे व तसेच काही गावातील नागरिक हजर होते.

Leave a Comment