प्रतिनिधी अशोक भाकरे
अकोला, तालुका जिल्हा धनाड्य, सावकार, उद्योजक यांच्या घरावर दरोडा पडल्याचे आणि लाखो, करोडो रुपयांचे धन, नगदी राशी किंवा मुल्यवान वस्तूची चोरी झाल्याचे आपण अनेकदा ऐकतो. मात्र, एखाद्या शेतकऱ्यांच्या शेतशिवारात दरोडा पडला आणि त्या दरोडेखोरांनी त्याचे ‘गो’ धन
(गोवंश ) चोरुन नेले, अशी लज्जास्पद घटना नुकतीच बाखराबाद येथे घडली आहे. या घटनेमुळे शेतकरी तसेच शेतकऱ्यांच्या ‘गो’धन सुरक्षेवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बाळापूर तालुक्यातील उरळ पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाखराबाद शेतशिवारात ही घटना घडली असुन संबंधित शेतकरी आकोश रामचंद्र माळी (वय ७२ वर्षे) यांनी त्याबाबतची तक्रार उरळ पोलिस स्टेशन येथे दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी त्यांनी त्यांच्या शेतातील टिनपत्र्याच्या खोलीत त्यांचे दोन बैल, दोन गायी व एक वासरी, असे पाच जनावरे बाधली व जेवन करून ते झोपले. मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास एका व्यक्तीने त्यांच्या छातीवर बसून त्यांचे तोंड दाबले व दुसऱ्या व्यक्तीने पायावर बसून हात, पाय बांधले. त्यानंतर त्यांच्या सोबतच्या दोन व्यक्तींनी गोठ्यात बांधलेली बैलजोडी व दोन गायी, असे एकूण ८० हजार रुपयांचे गोवंश नायगावकडे पैदल चोरून नेले. त्यानंतर स्वतःची कशीबशी सुटका करून घेत गावात जाऊन स्वतःची मुले, नातेवाईक व पोलिस पाटलांना या घटनेची माहिती दिली तसेच सर्वांनी नायगाव व इतर रस्त्यांनी शोध घेतला. परंतु, चोर सापडले नाहीत. अशा क्रमाने शस्त्रांचा धाक दाखवून व हातपाय बांधून ही चोरीची
घटना घडली असून, त्याबाबत त्वरित तपास घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी तक्रार आकोश माळी यांनी उरळ पोलिस स्टेशन येथे गुरुवार दि १७ नोव्हेंबर रोजी दिली. त्यांच्या तक्रारीवरून अप.नं. २५४/२०२२ कलम ३९२ भादवी नुसार गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे.