गणेशोत्सवात शाळा, महाविद्यालयाना सुट्या जाहीर

 

संतोष काळे बाळापूर

दोन वर्षाच्या कोरोना प्रादुर्भावाच्या निर्बंधानंतर यंदा मोठ्या धुमधडाक्यात उत्साहात गणेत्सोव साजरा करण्यात येणार आहे. गणेशाच्या आगमनाला काही दिवस शिल्लक राहिले असतांना शाळा महाविद्यालयाच्या सुट्या बाबत मोठी बातमी समोर आली आहे.

घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. शिक्षण विभागाने गणत्सोव दरम्यान शाळा आणि महाविद्यालयांना एकूण ५ दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. पत्राद्वारे याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सवात सुट्टी मिळावी, अशी मागणी मनसे आणि अनेक विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. या सर्वाची दखल घेत शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. तसेच या ५ दिवसांच्या सुट्टीदरम्यान कोणत्याही लेखी किंवा तोंडी परीक्षेचं आयोजन करु नयेत, असं आवाहनही करण्यात आल आहे. तसेच पालक वर्गाची काही तक्रार येणार नाही, याबाबतही काळजी घेण्याचे आदेश या पत्राद्वारे केल आहे.

Leave a Comment