गणेश ने अपंगत्वावर मात केली पण त्याचबरोबर त्याने बेरोजगारीवर सुद्धा मात केली !

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

माणसाचं जीवन हे क्षणभंगुर असतं नसतो !परंतु जीवन जगण्यासाठी सर्वच हात-पाय व्यवस्थित असावे लागतात असे नाही तर जे अवयव निसर्ग ने दिली तेच अवयवावर काहीजणांनी मात करून आपला व्यवसाय थाटामाटात सुरू केला आहे ।असंच साखरखेर्डा येथील वार्ड क्रमांक सहा मध्ये राहणारा श्री गणेश बेहिरे हा तरुण उच्चशिक्षित असून दिव्यांग आहे एक पाय अपंगत्व आल्यामुळे आपण घरी बसून चालणार नाही तर सुशिक्षित असून काही तरी उद्योग उभारावा हे विचार त्यांच्या डोक्यात होते !म्हणून गणेश ने खचून न जाता मित्राच्या मदतीने भाऊबीज सणाच्या दिवशी एक पिठाची गिरणी घरी आणली व बसवली ।व पीठ गिरणी चा व्यवसाय सुरू केला !गणेश ने समाजाला हे दाखवून दिले आहे की अपंगत्वावर मात केलीच केली पण उच्चशिक्षित असूनही त्याने बेरोजगारीवर सुद्धा उद्योग उभारून मात केली ।त्याचा आदर्श इतर दिव्यांग बांधवांना नक्कीच प्रेरणादायी आहे ।

Leave a Comment