सिंदखेडराजा (सचिन खंडारे )
गावंडे महाविद्यालयासमोरील गतीवरोध काला पांढरपट्टे नसल्यामुळे रोज अपघात घडत आहे !साखरखेर्डा येथुन पाचशे मीटर अंतरावर शिंगणे महाविद्यालय आहे येथे जवळपास सात ते आठ हजार विद्यार्थी विविध विषयात शिक्षण घेत आहे ‘महाविद्यालया मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थी पालकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि साखरखेर्डा येथून हा रस्ता लव्हाळा मार्गे मेहकर – चिखली -खामगाव -तिकडे जाते त्यामुळे वाहनधारकांची संख्या या रस्त्याने मोठ्या प्रमाणामध्ये आहे !तसेच दुचाकीस्वारांची संख्या खूप आहे ।दुचाकीस्वरांना दोन्ही गतिरोधक हे दिसत नसल्यामुळे हात सटकून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे ‘या गतिरोधक आवर आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून ४०च्या वर दुचाकीस्वार मोटर सायकल वरून पडले आहे !गावंडे महाविद्यालया समोरील गतीवरोधकावर अपघाताची मालिका सुरूच असून अनेकांना आपले हात-पाय गमवावे लागले आहे ‘अनेक मुले -महिला जखमी सुद्धा झालेले आहेत ‘तरी दोन्ही गतीरोधकावर कायमस्वरूपी पांढरे पट्टे मारण्यात यावे अशी मागणी वाहनचालक करीत आहेत !