Home बुलढाणा गाव पातळीवर सर्वे करून मदत मिळणे बाबत तलाठ्याला सत्याग्रह शेतकरी संघटनेतर्फे निवेदन.

गाव पातळीवर सर्वे करून मदत मिळणे बाबत तलाठ्याला सत्याग्रह शेतकरी संघटनेतर्फे निवेदन.

385
0

 

खामगाव.=या वर्षी खरीप हंगामातील पिकाला आवश्‍यक असलेल्या पावसापेक्षा अति जास्त पाऊस झाल्यामुळे पहूर जीरा मोरगाव जलंब पारखेड लांजुळ मक्ता शिवारातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहेत आधी मूग उडीद तीड पिकांची नुकसान झाले असून आता सोयाबीन कापूस ज्वारी बाजरी मका सारख्या पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळाला आहे सदर भागातील बहुसंख्य शेतकऱ्याचा चरितार्थ हा शेतीवर अवलंबून आहे वर्षातून एकदाच येणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असणारा परिवार आज निराधार झाला आहे अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे तर काहींना पिक विमा काढणे शक्य झाले नाही आज झालेले नुकसान पाहून अनेकांच्या मनात धास्ती भरले असून धास्तीने जीवन यात्रा संपू शकते किंवा आत्महत्या करून आपल्या जीवन यात्रेला पूर्णविराम देऊ शकतात ह्या घटना टाळण्यासाठी आपली जबाबदारी व अधिकार म्हणून आमची मागणी शासनापर्यंत व पिक विमा कंपनी समोर मांडून आम्हाला झालेली नुकसान भरपाई मिळवून द्यावी करिता आज पहूर जीरा येथे सत्याग्रह शेतकरी संघटना व समस्त शेतकऱ्यांच्या वतीने तलाठ्याला निवेदन देण्यात आले सदर निवेदनात सत्याग्रह शेतकरी संघटना युवा आघाडी गणेश सडत कार अनिल गव्हांदे शेख आयाज संजय फाटे अमीर शाह शेख शब्बीर धीरज फाटे पवन चव्हाण निलेश उचांडे निलेश घो पे तसेच असंख्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत

Previous articleलोणार तहसीलवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश मोर्चा
Next articleपरतीच्या पावसामुळे झालेल्या पिकनुकसानीबाबत सूनगाव येथिल शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना केले निवेदन सादर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here