गिरड सर्कल मधिल पाच गावातील अनेकांच्या हातावर घडी..

 

 

.नईम मलक हिंगनघाट

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अतुल भाऊ वांदीले यांच्या हस्ते झाला पक्ष प्रवेश …*

समुद्रपूर/ हिंगणघाट

अतुल भाऊ वांदिले यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशानंतर आता हिंगणघाट विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबुत करण्याच्या दृष्टीकोनातून पक्षात इन्कमिंग सूरु झाली आहे. समुद्रपूर तालुक्यातील गिरड सर्कल येथील पाच गावातील अनेक महिला ,पुरुषांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.
गिरड सर्कल मधील गिरड, साखरा, तावी, तळोदी, शिवनफळ येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गावा गावात मजबुत करण्याचा यावेळी निर्धार केला. *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य प्रदेश सरचिटणीस* *मा.श्री.अतुलभाऊ वांदिले यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत हा प्रवेश घेण्यात आला.
रा.का.चे गिरड येथील उपसरपंच मंगेशभाऊ गिरडे, सुभाषभाऊ चौधरी, राजू झिंगरे यांच्या पुढाकाराने आज हा पक्ष प्रवेश झाला.*
याप्रसंगी श्री दशरथजी ठाकरे वर्धा जिल्हा सरचिटणीस, सुनील भुते, राजू मुडे सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment