गजानन सोनटक्के
जळगाव जामोद प्रतिनिधी:-
जळगाव जामोद शहरातील स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या ग्रंथालयांमध्ये दिनांक २५ डिसेंबर रोजी श्रीमद्भगवद्गीता जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शनी व पुस्तकांचे प्रदर्शन संपन्न झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री.रा. देशमुख यांनी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाचे पूजन करून प्रदर्शनीचे उद्घाटन केले. श्रीमद्भगवद्गीतेशी संबंधित अन्य भाषेतील पुस्तके सुद्धा या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. विविध महानुभावांनी श्रीमद् भगवत गिते विषयी लिहिलेल्या विविध पुस्तकांचा सुद्धा या प्रदर्शनात समावेश होता. आप पेटीच्या आकाराची भगवद्गीता सुद्धा ह्या प्रदर्शनीमध्ये ठेवण्यात आली होती. श्रीमद्भागवत गीतेवर ह्यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम देशमुख, प्रा. चव्हाण, ग्रंथपाल संतोष कतोरे, ग्रंथालय विभागातील डाबेराव, समाधान यांचेसह महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थ्यांची या प्रदर्शनी मध्ये आपला सहभाग नोंदविला. ह्या ग्रंथप्रदर्शनाच्या आयोजनासाठी ग्रंथपाल संतोष कतोरे आणि ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.