गेवराई शेमी येथे वीज कोसळून बैलजोडी ठार

 

सिल्लोड तालुक्यात वीज कोसळण्याचे सत्र सुरूच

प्रतिनिधी:सागर जैवाळ

भवन:गेवराई शेमी येथील शिवारात वीज कोसळून बैलजोडी ठार झाली आहे. मागील आठ दिवसांपासून परतीच्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत असून त्यात वीज कोसण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चार दिवसापूर्वी पळशी येथील कांताबाई सोनवणे यांचा वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच पळशीतील गणेश बळे या शेतकऱ्याच्या गायीचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा गेवराई शेमी शिवारात घटना घडल्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. भाऊसाहेब महादू जाधव यांची ही बैलजोडी असून शेतातील कामे आटपून ते घराकडे निघाले होते.कोरोना,अवकाळी पाऊस, वीज कोसळणे आदी संकटाने शेतकरी त्रस्त झाले असून प्रशासनाने पंचनामा करून तात्काळ जाहीर करावी अशी मागणी होत आहे.

Leave a Comment