गोंदिया-शैलेश राजनकर
गोंदिया,- राज्यातील इतर मोठ्या महानगरामध्ये रात्रीच्या सुमारास वाहनांना आग लावून जाळण्याच्या घटना एैकावयासय नव्हे तर बघावयास मिळाल्या असताना आज गुरुवारच्या मध्यरात्रीला अज्ञातांनी गोंदियातील श्रीनगर भागात वाहनांनी आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील श्रीनगर परिसरात काही अज्ञातांनी दोन ते तीन चारचाकी गाड्या पेटवल्या आहेत. यामुळे वाहनमालकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
श्रीनगर परिसरात असलेल्या नागरी वस्तीत काही अज्ञात समाजकंटकांनी घराबाहेर पार्क केलेली चारचाकी वाहनं जाळल्या.गुरुवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.चंद्रशेखर वार्ड निवासी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत पोलीस कर्मचारी विजय खोब्रागडे यांची हुडंई कंपनीची सुमारे 10 लाख रुपये किमतीची कार पुर्णत जळून खाक झाली.त्याचप्रमाणे भीमनगर निवासी सुधीर कोल्हटकर यांची मिनी मेटाडोर ही सुध्दा जाळली.तर चंद्रशेखर वार्डातीलच माता मंदीरात रात्री 1 वाजेच्या सुमारास मंदिराचा ताला तोडून आत शिरण्याचा प्रयत्न करणारा एक युवक शेजारील एक व्यक्ती बाहेर आल्याने पसार झाला.त्यातच या जाळपोळीमुळे विजेचे तार खाली पडल्याने मोठी हानी होण्याची शक्यता होती मात्र अग्निशमनदल वेळेवर पोचल्याने मोठी घटना घडली.याप्रकरणा खोब्रागडे यांनी गोंदिया शहर पोलीसात तक्रार नोंदवली असून शहर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.