इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी
शेगाव. तहसीलदार समाधान सोनवणे यांची माहिती
अपघातग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शेगाव तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे
कृषी विभागाच्या वतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विमा कंपनीकडून वेळेत दावे मंजूर न झाल्याने योजनेमध्ये सुधारणा करून ती योजना यापुढे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणून राबविण्यात येत आहे, अशी माहिती तालुकास्तरीय समिती अध्यक्ष तथा तहसीलदार समाधान सोनवणे यांनी दिली आहे.
योजनेंतर्गत पात्रतेसाठी रस्ता / रेल्वे अपघात पाण्यात बुडून मृत्यू जंतूनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, अपघात, सर्पदंश व विंचू दंश, जनावरांच्या खाल्ल्यामुळे चावल्यामुळे जखमी-
मृत्यू बाळंतपणातील मृत्यू दंगल, यामुळे मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबाला आर्थिक लाभ देण्यासाठी वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही १ सदस्य (आई-वडील, शेतकऱ्यांचा मुलगा, अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वयोगटातील एकुण २ जणांकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणी असल्यास कृषी सहायक यांचेशी संपर्क साधवा, असे आवाहन सोनवणे यांनी केले आहे.