गोळेगाव बुद्रुक येथील विद्यार्थी व पालकांचा जिल्हा अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलनाचा ईशारा।

 

अर्जुन कराळे शेगाव प्रतिनिधी

शेगाव तालुक्या अंतर्गत येत असलेल्या ग्राम गोळेगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेला 2017 पासून एकच वर्गखोली असून त्यामध्ये चार वर्ग शिकत आहेत दुसरी खोली ही शिकस्त असून नवीन बांधकाम खोली साठी मुख्याध्यापक एस, एस, पिलात्रे यांनी वेळोवेळी पंचायत समिती शेगाव येथे संबंधित अधिकारी यांना कागदोपत्री पाठपुरावा केलेला आहे तरी सुद्धा अद्यापही शाळा बांधकामाला मंजुरात मिळाली नाही शाळाखोली बांधकाम लवकर मिळणे करिता शाळा शिक्षण समितीने दिनांक बारा मार्च 2022 रोजी शाळेला दहा दिवस कुलूप ठोकले होते , तसेच 22, फेब्रुवारी2022 रोजी गटविकास अधिकारी यांना स्मरणपत्र दिले होते त्यानंतर दिनांक एक ऑगस्ट 2022 रोजी आक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलन पंचायत समिती कार्यालयात करण्यात आले होते त्यानंतर माननीय गटविकास अधिकारी सतीश देशमुख पंचायत समिती शेगाव यांनी पत्रात लिहून दिले की पर्यायी व्यवस्था म्हणून
टिन शेळ देण्याकरिता ग्रामपंचायत सचिवांना प्रस्ताव देण्याचे सांगितले असून प्रस्ताव पंचायत समिती शेगावला प्राप्त होताच तो आम्ही जिल्हा प्रशासनाकडे मंजुराती करिता सादर करू असे पत्र देण्यात आले होते परंतु बारा दिवस उलटूनही कसल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे आज दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी शाळा शिक्षण समिती व पालक यांनी बुलढाणा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांना निवेदन देऊन सदर निवेदनात एक महिन्याच्या आत शाळेला मंजुरात किंवा पर्यायी व्यवस्था म्हणून टिन शेळ मंजुरात न झाल्यास दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हा परिषद कार्यालय बुलढाणा येथे चिमुकला विद्यार्थी सह आक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे सदर निवेदनात धम्मपाल समदूर शाळा समिती अध्यक्ष, देवचंद्र समदूर स्था,प्र,सदस्य ,पालक दिनेश गावंडे, मार्तंड बाजोड, संदीप गावंडे, हरिदास मापारी , शेषराव मोरखळे ,विजय गावंडे ,आदींचे स्वाक्षऱ्या आहेत करिता प्रशासनाने गोळेगाव बुद्रुक येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान वाचवण्यासाठी गोळेगाव बुद्रुक येथील जि प शाळेला त्वरित मुजरात द्यावी किंवा त्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून तात्काळ टिन शेळ व्यवस्था करावी अशी मागणी पालक वर्ग आणि गावकऱ्यांकडून होत आहे
फोटो
उपशिक्षणाधिकारी जैन साहेब यांना निवेदन देताना गोळेगाव बुद्रुक येथील पालक

Leave a Comment