गोवठणे गावात दिवसा ढवळ्या झाली चोरी. चोर अद्यापही फरार !!

 

घरात कोणीही नसल्याचे पाहून चोरांनी केले घर साफ !!!

उरण – रायगड जिल्हा: उरण तालुक्यातील गोवठणे गावातील रहिवाशी मनपसंत चंद्रकांत पाटील वय 32 वर्षे, धंदा -नोकरी, गोवठणे यांच्या घरी दिवसा ढवळ्या घरात कोणीही नसल्याचे पाहून चोरांनी घर साफ केले आहे. घरात असलेले सोने व रक्कम असे एकूण 6, 30, 500 रुपयाची मालमत्ता चोरीस गेल्याने गोवठणे गाव परिसरात एकच खळबळ माजली आहे. चोरी करणाऱ्या अनोळखी व्यक्ति विरोधात भारतीय दंड संहिता 1860 कलम 454, 380 अंतर्गत उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि मनपसंत चंद्रकांत पाटील राहणार गोवठणे, तालुका उरण हे CHA ची नोकरी करत असून त्यांची पत्नी संगीता ही गर्भवती असल्याने तिच्या उपचाराकरिता पत्नी उरण येथे गेले होते. मनपसंत यांचे वडील वडील कामानिमित्त आवरे येथे गेले होते. मनपसंत यांची आई राधा चंद्रकांत पाटील मनपसंत यांचा मुलगा स्मित पाटील हे घरात होते. मुलगा रडत असल्याने राधा यांनी मुलाला दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास बाहेर फिरण्यास घेऊन गेले. मात्र दुपारी 1:45 वाजण्याच्या सुमारास घरी परत आल्यावर कपाटातील सर्व सामान, कपडे व इतर सामान जवळच असलेल्या बेडवर पडलेले दिसले. किचनचा दरवाजा सुद्धा उघडा होता सदरचे घर दुमजली असून चोरांनी जिन्याद्वारे तळमजल्यात प्रवेश करून चोरी केल्याचा संशय आहे. 3, 20,000/- रुपयाचे 8 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, 1, 40, 000/- रूपयाचे जेन्टस चैन, 60, 000/- रुपयाचे सोन्याचे मंगळसूत्र, 48,000/- रुपयाचे 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुमके, 12,000/- रुपयाचे कानातील टॉप्स, 12,000/- रुपयाचे गळ्यातील चैन, 12,000/- रुपयाचे सोन्याचे 5 अंगठ्या, 4,000/- रुपयाची लेडीज अंगठी, 4,000/- रुपयाची कानाची बाळी, 18,500/- रुपयाचे रोख रक्कम त्यात 500 रुपयाचे 37 चलनी नोटा असे एकूण 6,30,500/- रुपयाची मालमत्ता चोरीस गेली आहे.

चोराने घरात वरच्या मजल्यावरून घरात प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी कपाटाचे लॉकर व ड्रॉवर कशाने तरी तोडून त्यातील वरील वर्णनाचे व किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केली आहे. चोरी करणाऱ्या या अनोळखी व्यक्ति विरोधात मनपसंत पाटील यांनी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. चोरांचा त्वरित शोध लावून सदर घटनेस न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मनपसंत पाटील यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

 

Leave a Comment